आज श्रावणातला चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. श्रावण महिना आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता श्रावण संपून भाद्रपद महिना लागणार आहे. कोणताही महिना अमावस्या तिथिने संपतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात. तसे पाहिले तर आपल्याकडे अमावस्या ही तिथी तितकीशी शुभ मानली जात नाही. या दिवशी कोणतीही शुभ कामं, पूजा वैगैरे काही केले जात नाही. (Shravan)
मात्र वर्षात अशा देखील काही अमावस्या आहेत ज्या अतिशय चांगल्या आणि शुभ फळ देणाऱ्या महत्वाच्या असतात. यातलीच एक अमावस्या म्हणजे ‘पिठोरी अमावस्या’. श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला असाधारण महत्व आहे. हिंदू परंपरेत पिठोरी अमावस्येचे स्नान, दान, पूजा-पाठ आणि पितरांना नैवेद्य दाखविणे यास विशेष महत्व आहे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. (Pithori Amavsya)
पिठोरी अमावस्या कधी आहे?
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीची सुरुवात २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५५ वाजता होईल आणि या तिथीची समाप्ती २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३५ वाजता होईल. उदयतिथीनुसार, शनिवार २३ ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येचे व्रत पाळले जाणार आहे. अनेक राज्यांमध्ये पिठोरी अमावस्येला कुशाग्रहणी पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. या अमावास्येच्या दुसऱ्या दिवसापासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होते. (Marathi)
पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अमावस्येची कथा ऐकवली होती. धार्मिक मान्यतेनुसार, पिठोरी अमावस्येच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होते. या दिवशी गरजूंना भोजन दान करावे. या दिवशी श्री हरि भगवान विष्णूच्या पूजेने मोठ्यात मोठे संकट दूर होते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी – देवतांचे आशीवार्द मिळतात. पिठोरी अमावस्येला गंगास्नाला विशेष महत्व आहे. आस्थेने गंगा स्नान केल्यास पापातून प्रायश्चित घेता येते. ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. या दिवशी स्त्रिया पीठाने देवी दुर्गासह ६४ देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. (Marathi News)
पिठोरी अमावस्येच्या पूजेसाठी मुहूर्त
सूर्योदय – सकाळी ५.५४
ब्रह्म मुहूर्त – सकाळी ४.२६ ते ५.१०
अभिजित मुहूर्त – सकाळी ११:५८ ते दुपारी १२:५० पर्यंत
प्रदोष मुहूर्त – संध्याकाळी ०६:५३ ते रात्री ०९:०६ पर्यंत
सायहान मुहूर्त – संध्याकाळी ०६:५३ ते रात्री ०८
==============
हे देखील वाचा : Shravan : भूमिज शैलीतील एकमेव ९६३ वर्ष जुने ‘आम्रनाथ’ शिव मंदीर
==============
पिठोरी अमावास्येची पूजा कशी करावी?
पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा. या दिवशी पांढरे कपडे घाला. हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. घरातील मुलांस अगर मुलीस खीरपुरीचे वायन देतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करुन खांद्यावरुन मागे नेत अतीत कोण? असा प्रश्न विचारतात. मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात. अशा रीतीने व्रत पूर्ण केले महणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात. (Todays Marathi Headline)
या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं. या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं. काही ठिकाणी देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात. म्हणून प्रत्येक देवी अर्थात ६४ योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मुरत्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या. (Marathi Festival)
त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे. अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. त्याची देखील पूजा केलेली चालते. त्यावर हळदी, कुंकू, अक्षता, हार, फुल, आघाडा, 108 मण्यांची कापसाची माळ इत्यादी अर्पण करावे. तसेच काही ठिकाणी वाळूने आठ लहान डोंगर तयार करुन त्यापुढे काकडीचे पान आणि त्यावर काकडीचे काप ठेवून पूजा केली जाते. आठ छोट्या पुरणपोळ्या/ स्वयंपाक बनवून त्यादेखील काकडी च्या पानावर ठेवतात. विधिपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य. (Top Marathi News)
काही ठिकाणी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फूले अर्पण करा. या दिवशी तीळाच्या तेलाच्या दिवा लावावा आणि शिव मंत्रांचा जप करावा. त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा. संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न ७ दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. पिठोरी अमावस्येला “ओम पितृ गणाया विद्महे जगत् धारिणी धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात्। ओम आद्य-भूतया विद्महे सर्व-सेवाया धीमही। शिव-शक्ती-स्वरूपें पितृ-देव प्रचोदयात् । ” या मंत्राचा जप करावा. (Latest Marathi Headline)
पिठोरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आई मुलाला औक्षण करून वाण लावते. यामध्ये काही ठिकाणी जे पक्वान्न या दिवशी बनवतात त्याचे वाण लावतात तर काही ठिकाणी गोड पुऱ्या, खीर हे बनवून त्याचे वाण लावले जाते. आई पक्वान्न हातात घेते आणि मुलाच्या मागे उभे राहून त्याचे डोळे हाताने झाकून विचारते, ‘अतिथी कोण?’ तेव्हा मुलं ‘मी आहे’ असे म्हणत आपले नाव सांगतात मग आई हाताची पक्वान्न त्याला देते. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात. (Top Trending Marathi News)
पिठोरी अमावस्या कहाणी
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील ! (Top Trending News)
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेलासुध्दा असंच झालं. तेव्हा मामंजीं माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो ! असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे ? असं म्हणून रडू लागली. (Top Marathi Headline)
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथ तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं. (Latest Marathi News)
त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. (Top Marathi Stories)
==============
हे देखील वाचा : Ekadshi : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी ‘अजा एकादशी’
Shravan : ‘या’ कारणामुळे उद्याचा चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ठरणार खास
===============
ती आपल्या गावांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics