Home » गुलाबी ओठांसाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

गुलाबी ओठांसाठी ‘हे’ करा घरगुती उपाय

आपण चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी विविध ब्युटी ट्रिटमेंट करतो. पण त्याचसोबत ओठांची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

by Team Gajawaja
0 comment
Pink Lips Tips
Share

आपण चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी विविध ब्युटी ट्रिटमेंट करतो. पण त्याचसोबत ओठांची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी मार्केटमध्ये बहुतांश ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध असतात. गुलाबी ओठांसाठी नक्की काय करावे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. (Pink Lips Tips)

गुलाबी ओठांसाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. सर्व घरगुती उपाय हे मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्रोडक्ट्सपेक्षा अधिक सुरक्षित असतात. अशातच गुलाबी ओठांसाठी पुढील काही खास टिप्स.

पपई

How To Eat Papaya, For The Uninitiated
पपई आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. याचे काही फायदे होतात. गुलाबी ओठांसाठी तुम्ही पपईचा वापर करू शकता. याशिवाय पपईमध्ये असे काही पोषण तत्त्वे असतात जे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून तुम्हाला दूर ठेवतात. पपईचा फेस मास्क पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरतो.

मध

7 Unique Health Benefits of Honey
मध आपल्या त्वचेवरील जमा झालेले पोर्स स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्यासही फायदेशीर ठरते. गुलाबी ओठांसाठी तुम्ही मध आणि साखर मिक्स करून त्याचे मिश्रण ओठांना लावू शकता. यामुळे हिवाळ्यात काळे पडलेले ओठ गुलाबी होण्यास मदत होईल. (Pink Lips Tips)

गुलाबी ओठांसाठी खास टिप्स
जर तुमचे ओठ काळे पडले असल्यास तर पुढील काही टिप्स नक्कीच फॉलो करू शकता.
-गुलाबी ओठांसाठी एका वाटीत सर्वप्रथम दोन चमचे मध घेऊन त्यात पपईचा रस मिक्स करा.
-आता मिक्स करण्यात आलेली पेस्ट आपल्या बोटांनी ओठांवर लावा
-ओठांना हलक्या हाताने स्क्रब करत दोन ते पाच मिनिटे मसाज करा
-मसाज केल्यानंतर कॉटनच्या मदतीने ओठांवरील स्क्रब व्यवस्थितीत धुवून घ्या
-तुम्ही पपई आणि मधाचा पॅक ओठांना लावून काळे पडलेल्या ओठांची समस्या दूर करू शकता.

टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘kalakrutimedia.com’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


आणखी वाचा: थंडीत त्वचेला स्क्रब करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.