लडाख (ladakh) म्हणजे भारतातील सर्वात विरळ लोकसंख्या असलेला आणि निसर्गानी भरभरुन वरदान दिलेला भाग आहे. उंच शिखरे आणि द-या हे लडाखचे वैशिष्ट. त्यातही तिथले हवामान हे मार्च, एप्रिल, मे महिन्यात अत्यंत सुसह्य असते. त्यामुळेच या महिन्यात लडाखमध्ये पर्यटकांची संख्या वाढती आहे. यासाठी गेल्या काही वर्षात लडाखमध्ये (ladakh) एप्रिल महिन्यात एप्रिकॉटच्या फुलांचा बहर बघण्यासाठी विशेष महोत्सव होत आहे. या एप्रिकॉट म्हणजेच जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलसाठी देशातूनच नाही तर विदेशातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक लडाखमध्ये दाखल होत आहेत.
एप्रिल महिन्यात लडाखमधील (ladakh) सर्वच भागात एप्रिकॉटच्या झाडांना हलक्याश्या गुलाबी रंगाची फुले येतात. हा बहर एवढा असतो की या झाडावर एकही पान रहात नाही. संपूर्ण झाड एप्रिकॉटच्या फिक्कट गुलाबी फुलांनी बहरून जाते. अशी अनेक झाडे या लडाखमध्ये दिसू लागल्यावर हा फुलांचा बहर येथे आगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात येतो. अलिकडे या बहर बघण्यासाठी पर्यटकांची वाढती संख्या पहाता, स्थानिकांनी लडाख जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. सुट्टीमध्ये जर कोणी फिरण्यासाठी नवीन जागा शोधत असेल तर त्यांच्यासाठी लडाख (ladakh) आणि तेथील हा जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल अत्यंत अनोखा ठरणारा असाच असेल.
लडाखमध्ये मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वत्र जर्दाळूच्या फुलांचा बहर येण्यास सुरुवात होते. या फुलांनी बहरणारी झाडे आणि त्यातून वाढणारे लडाखचे सौदर्य पहाता लडाख (ladakh) पर्यटन विभागातर्फे जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण एप्रिल महिना हा या फुलांच्या बहराचा असतो. एप्रिलमध्ये लडाखमधील हवामानतही थोडा थंडावा असतो. त्यामुळेच संपूर्ण भारतभर जिथे उष्म्याच्या लाटा सुरु असताता, तिथे लडाखमध्ये थंडगार हवामान आणि एप्रिकॉट फुलांचे मनमोहणारे सौदर्य याचा अनुभव घेता येऊ शकतो. याला जोडून जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलचे निमित्त साधत स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. शिवाय लडाखमध्ये (ladakh) हस्तकलेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात केल्या जातात, त्या वस्तूंचेही इथे प्रदर्शन भरवले जाते. याशिवाय जर्दाळूपासून बनवलेले विविध पदार्थही येथे उपलब्ध असतात. त्यात जर्दाळू जाम, वाळलेल्या जर्दाळू, रस, जर्दाळू वाइन यांचाही समावेश असतो. अलिकडे पर्यटनात वाढ झाल्यामुळे या स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलची प्रेरणा जपानमधील होणा-या चेरी ब्लॉसम फेस्टिवलमधून घेण्यात आली आहे. जपानमध्ये होणा-या या चेरी ब्लॉसम फेस्टिवलमध्ये जगभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात जपानला भेट देतात. त्यातून मोठा आर्थिक व्यवहार होतो. तसाच प्रयत्न आता लडाखमध्ये (ladakh) पर्यटन विभागातर्फे करण्यात येत आहे. हा जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल खालसी, लेहमध्ये होतो. तसेच लेहमधील दुर्गम अशा खालसी भागातील दाह आणि बिमा गावातही या प्रकारचा महोत्सव होतो. त्यातून लडाखमधील दुर्गम भागातील नागरिकांना उद्योगाची संधीही मिळणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात हस्तकलेच्या वस्तूही केल्या जातात. या भागात एप्रिकॉट बघायला आलेले पर्यटक या स्थानिक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलचे निमित्त साधत अनेक छायाचित्रकार येथे गर्दी करत आहेत.
=========
हे देखील पहा : उत्तराखंड रंगले फुलदेईच्या रंगात
=========
याशिवाय लडाखमधील (ladakh) राजवाडे, तलाव आणि मठ बघण्यासाठीही पर्यटक उत्सुक असतात. याशिवाय एप्रिल, मे महिन्यात येथे आल्हाददायक हवामान असते. त्यामुळे ट्रेकिंग, कॅम्पिंग करण्यासाठीही येथे गर्दी होते. गेल्या काही वर्षात या जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हलनिमित्त लडाखमध्ये वाढते पर्यटन बघता पर्यटन विभागानं यावर्षीही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. तसेच पर्यटकांची वाढती संख्या पहाता होम स्टे ही सुरु केले आहेत. त्यामुळे पर्यटक स्थानिकांच्या घरी रहातात आणि त्यांना जवळून येथील संस्कृती पहाता येते. तसेच स्थानिकांनाही त्यातून उत्पन्न मिळू शकते.
लडाखमध्ये (ladakh) दरवर्षी 16 हजार टन जर्दाळूचे उत्पादन होते. या जर्दाळूच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या आर्थिक फायद्यात भर पडत आहेत. आता फक्त ही फळच नाही तर त्याची फुलंही लडाखला आर्थिक फायदा करुन देत आहेत. लडाखमधील महिला मोठ्या प्रमाणात या जर्दाळूपासून साठवणुकीचे पदार्थ तयार करत असल्यामुळे त्यांनाही उद्योग मिळाला आहे. येथील हलमन जातीचे जर्दाळू 400 रुपये किलोपर्यंत विकली जाते. रक्तसे करपो या जर्दाळूला जिओ टॅग मिळाला आहे.
सई बने