हॉंगकॉंगमध्ये नुकत्याच झालेल्या एका लिलावात दुर्लभ असा गुलाबी रंगाचा हिरा (Pink Diamond) हा तब्बल ४८० कोटी रुपयांना विक्री करण्यात आला. या हिऱ्याच्या लिलावाच्या बोलीमुळे आता जागतिक रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. त्याचा सोथबी हॉंगकॉंग मध्ये लिलाव करण्यात आला. या गुलाबी हिऱ्याचे नाव विलियमसन पिंक असे असून तो ११.१५ कॅरेटचा आहे. विलियमसन पिंक हा लिलावात विक्री केला गेलेला सर्वाधिक मोठा गुलाबी हिरा होता. गुलाबी हिरा हा सर्वाधिक मौल्यवान, दुर्लभ आणि जागतिक बाजारात सर्वाधिक मागणी असणारा हिरा आहे.
विलियमसन पिंक स्टारचे नाव अन्य दोन गुलाबी हिऱ्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले. यामधील पहिला २३.६० कॅरेटचा विलियमसन हिरा आहे. जो १९४७ मध्ये दिवंगत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांना लग्नात भेट म्हणून दिला गेला होता. तर दुसरा ५९.६० कॅरेटचा पिंक स्टार हिरा आहे जो २०१७ मध्ये लिलावात सात कोटी १२ लाख अमेरिकन डॉलर मध्ये विक्री करण्यात आला होता.

रंगीत हिऱ्यांपैकी सर्वात दुर्लभ आणि मौल्यवान गुलाबी हिरे
गुलाबी हिरे रंगीत हिऱ्यांपैकी सर्वात दु्र्लभ आणि सर्वाधिक मौल्यवान आहे. याच पार्श्वभूमीवर सोथबीच्या एशियात दागिने आणि घड्याळांचे अध्यक्ष वेन्हो यू यांनी असे म्हटले की, विक्री केवळ एशियातील उच्च गुणवत्ता असणारे हिऱ्यांना खुप मागणी असते. त्याचसोबत गुलाबी हिरे दुर्लभ असल्याने त्याबद्दल ही जागृकता वाढवली जाते. तर युकेचे ज्वेलरी रिटेलर ७७ डायमंड्सचे निर्देशक टोबियास कोरमाइंड यांनी असे म्हटले की, आश्चर्यजनक विक्रीने दाखवून दिले की, उच्च गुणवत्ता असणारे हिरे सुद्धा एक अस्थिर अर्थव्यवस्थेला उत्तम मूल्य मिळून देऊ शकता. (Pink Diamond)
हे देखील वाचा- १३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर
यापूर्वी सुद्धा झाला होता असा लिलाव
नुकत्याच अशा प्रकारची आणखी एका हिऱ्याचा लिलाव झाला होता. द रॉक नावाच्या सफेद डायमंड हिऱ्याचा लिलाव जेनेवात झाला होता. हा दुर्लभ सफेद हिरा दक्षिण अफ्रिकेच्या एका खाणीत मिळाला होता. या हिऱ्याचे वजन २२८.३१ कॅरेट होते. या लिलावात आणखी एक २०५.७ कॅरेटचा पिवळ्या रंगाच्या हिऱ्याचा सुद्धा लिलाव करण्यात आला होता. या हिऱ्याचे नाव रेड क्रॉस डायमंड होते. या दोन्ही हिऱ्यांचा लिलावामुळे रेकॉर्ड ब्रेक झाला होता.