Home » फोन चार्जिंग करताना तुम्ही सुद्धा ‘ही’ चुक करता का?

फोन चार्जिंग करताना तुम्ही सुद्धा ‘ही’ चुक करता का?

सध्या स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सतत फोनवर अवलंबून रहावे लागते.

by Team Gajawaja
0 comment
Phone charging mistakes
Share

सध्या स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सतत फोनवर अवलंबून रहावे लागते.  सध्या एका क्लिकवर सर्वकाही मिळत असल्याने बहुतांश जणांना यापासून दूर राहवत नाही. तर काहींना फोनशिवाय अस्वस्थ वाटते. अशातच जर तुम्ही काही महत्त्वाचे पाहत असाल आणि तेव्हाच मोबाईलची बॅटरी कमी झाली तर अजून चिडचिड होतो. मात्र मोबाईल चार्जिंगला लावताना तुम्ही काही चुका केलात तर फोन लवकर बिघडू शकतोच. पण त्याचा स्फोट झाल्याच्या ही घटना समोर आल्या आहेत. अशातच नक्की फोन चार्ज लावण्याची योग्य पद्धत काय आणि काय चुका करणे टाळावे याच बद्दल पाहूयात. (Phone charging mistakes)

फोनची बॅटरी १०० टक्के चार्ज करावी का?
बहुतांश लोकांचे असे मानणे असते की, फोन शंभर टक्के चार्ज केल्यामुळे काही समस्या येत नाही. तसेच काही लोक फोन चार्ज असल्याने घराबाहेर पडल्यानंतर काही काही अडचण आल्यानंतर त्याचा वापर करता येईल म्हणून फोन शंभर टक्के चार्ज करतात. मात्र एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की, फोनची बॅटरी शंभर टक्के चार्ज करणे हे फोनच्या बॅटरीसाठी योग्य नाही. जेव्हा तुम्ही फोन चार्ज करता तेव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, त्याची बॅटरी शंभर टक्के कधीच करु नये. फोन नेहमीच शंभर टक्क्यांहून थोडा कमी चार्ज करावा. तुम्ही फोनची बॅटरी ८०-९० टक्के करावी. यामुळे तुमच्या बॅटरी लाइफवर ही परिणाम होतो.

रात्रभर फोन चार्ज करणे किती योग्य?
बहुतांश लोक व्यस्त असतात आणि रात्रीभर फोन चार्जला लावून झोपतात. जेणेकरुन फोन पूर्णपणे चार्ज झालेला असतो. अशातच आजकाल जे मार्केमध्ये फोन उपलब्ध आहेत ते शंभर टक्के चार्ज करण्याची काहीच गरज नाही. ते तुम्ही कमी वेळातच चार्ज करु शकता. फोन दीर्घकाळ चार्ज करणे फोनच्या बॅटरीसाठी योग्य नाही. यामुळे फोन त्यावेळी चार्ज करावा जेव्हा तुम्ही जागे असता. कधीकधीफोन गरजेपेक्षा अधिक चार्जिंगला सुद्धा ठेवू नका. अन्यथा समस्या येऊ शकते किंवा एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते. (Phone charging mistakes)

हेही वाचा- YouTube वरुन कमावत असाल तर आधी ‘हे’ वाचा

बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर चार्ज करावी का?
काही लोक असे मानतात की, फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर चार्जला लावू नये. म्हणजेच पूर्णपणे फोनची बॅटरी संपल्यानंतर तो चार्जिंगला लावू नये. त्याचसोबत फोन शंभर टक्के सुद्धा चार्ज करु नये, जर तुम्ही फोन चार्जला लावत असाल तर तो ८० टक्केच चार्ज करा. असे म्हटले जाते की, २०-८० टक्क्यांपर्यंत फोनची बॅटरी असणे फोनसाठी योग्य असते. सॅमसंगनुसार आजकाल बहुतांश फोनमध्ये लिथियम बॅटरी असते. त्यांना सतत चार्ज केल्यानंतर त्याची लाइफ दीर्घकाळ टिकते. जुन्या फोनमध्ये दुसरी बॅटरी यायची आणि त्याचे फंक्शन हे वेगळे होते. यासाठी बॅटरीला ५० टक्क्यांपेक्षा अधिक चार्ज करुन ठेवा आणि वारंवार डिस्चार्ज होण्यापासून दूर रहा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.