Home » फिलिपिन्समध्ये ड्रग्ज किंवा सोन्याची नव्हे तर चक्क कांद्याची होतेय तस्करी

फिलिपिन्समध्ये ड्रग्ज किंवा सोन्याची नव्हे तर चक्क कांद्याची होतेय तस्करी

by Team Gajawaja
0 comment
Philippines Onion Crisis
Share

फिलिपिंन्समध्ये कांद्याचे दर वेगाने वाढत आहेत.येथे कांद्याच्या किंमतीत तुफान वाढ झाल्याने आता लोक त्याची चक्क तस्करी करु लागले आहेत. फिलिपिंन्समध्ये कांद्याचे दर हे चिकनपेक्षा ३ पट अधिक वाढले गेले आहे. देशात चिकिन २२० पेसो ($ 4) प्रति किलोग्रॅम होते. तर कांदा ६०० फिलीपीन पेसो ($ 11) प्रति किलोग्रॅमने विक्री केला जात आहे. (Philippines Onion Crisis)

फिलीपींस हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह्सच्या रेजिडेंट अर्थशास्री जॉय सलेसेडा यांनी नुकतेच असे म्हटले होते की, जगातील सर्वाधिक महागडा कांदा देशात विक्री केला जात आहे. फिलीपिंन्सच्या जनतेकडून याबद्दल सोशल मीडियात तक्रारी केल्या जात आहेत. लोकांकडून सोशल मीडियात कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे नाराजी व्यक्त करत आहेत.

का महाग झालायं कांदा?
देशात सर्वत्र फक्त वाढलेल्या कांद्याच्या किंमतीतीच जोरदार चर्चा सुरु आहे. तज्ञ असे म्हणतात की, गेल्या वर्षात आलेल्या वादळामुळे किंमतीत वाढ झाली असेल असे त्यामागे कारण आहे. वादळामुळे अरब-कोटी रुपयांची शेती नष्ट झाली. फिलीपींन्सच्या सांख्यिकी प्राधिकरणानुसार देशात देश अलिकडच्या काही महिन्यांत वाढत्या महागाईशी झुंजत आहे, डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या किमती 8.1% वाढल्या, 14 वर्षांचा उच्चांक. कांद्याचे भाव वाढण्यामागे हेही एक प्रमुख कारण आहे. याशिवाय तस्करी, हेराफेरी आणि साठेबाजीमुळे किमती गगनाला भिडल्या आहेत.

कांद्याची तस्करी
फिलीपिंन्समध्ये कांद्याचा ऐवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, देशात त्याची तस्करी केली जात आहे. शासकीय फिलीपींस समाचार एजेंसीनुसार सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी २३ डिसेंबरला कपड्यांच्या शिपमेंटमध्ये लपवून २ लाख डॉलरपेक्षा अधिक सफेद कांदा जप्त केला गेला.या व्यतिरिक्त ८ जानेवारीला चीन मधून आणला गेलेला ३ लाख ७० हजार डॉलरचा लाल कांदा ही जप्त केला गेला होता.(Philippines Onion Crisis)

हे देखील वाचा- आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गुप्तहेराची चर्चा

सरकारने उचलले असे पाऊल
फिलीपींन्स मध्ये कांद्यांच्या तस्करीला थांबवण्यासाठी सरकाराने काही मोठी पावले उचलली आहेत. फिलीपींन्सच्या सीनेटर शेरविन विन गॅचलियन यांनी तस्करी पासून सुटका मिळावी म्हणून एक टास्क फोर्स बनवण्याचे आव्हान केले आहे. सीएनएनच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपति मार्कोस यांनी याच आठवड्यात २१,६० मेट्रिक टन कांद्याच्या आयातीला मंजूरी दिली आहे. ज्याची शिपमेंट २७ जानेवारी पासून येण्याची शक्यता आह. असे सांगितले गेले आहे की, फिलीपींसमध्ये प्रत्येक महिन्याला जवळजवळ २० हजार मेट्रिक टन कांद्याचा वापर केला जातो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.