Home » PFI काय आहे? नक्की का त्यांच्याबद्दल नेहमीच बदनामी केली जाते जाणून घ्या अधिक

PFI काय आहे? नक्की का त्यांच्याबद्दल नेहमीच बदनामी केली जाते जाणून घ्या अधिक

by Team Gajawaja
0 comment
PFI
Share

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय (PFI) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी एनआयएने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. खरंतर नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसीने दिल्लीसह ११ राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या दरम्यान १०० हून अधिक लोकांना अटक ही करण्यात आली आहे. येथे लक्ष देण्याची गोष्ट अशी की, एनआयएद्वारे करण्यात आलेले हे ऑपरेशन सर्वाधिक मोठे ऑपरेशन असल्याचे सांगितले जात आहे. पीटीआयच्या मते, ही छापेमारी टेरर फंडिंग, ट्रेनिंग कॅम्प्सच्या आयोजन आणि काही लोकांना दहशतवादी बनवण्यासाठी पीएफआयचा हात असल्याच्या कारणामुळे केली गेली.

एनआयएने कर्नाटकची राजधानी बंगळुरुत १० ठिकाणांसह राज्यातील विविध ठिकाणी सुद्धा छापेमारी केली आहे. यामध्ये पीएफआयचे राज्य अध्यक्ष नजीर पाशा यांच्या घराचा सुद्धा समावेश आहे. या छापेमारी बद्दल पीएफआयने असे म्हटले की, आम्ही फॅसिस्ट शासनाद्वारे विरोधाचा आवाज गप्प करण्यासाठी एजेंसिंचा वापर करत त्यांच्या या पावलांचा विरोध करत आहोच पीएफआयनेच्या विधानाने पुष्टी केली की, याच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक नेत्यांच्या घरी सुद्धा छापेमारी केली जात आहे. तर जाणून घेऊयात पीएफआय काय आहे आणि ते काय काम करतात त्याबद्दल अधिक.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली?
पीएफआयची (PFI) २००७ मध्ये दक्षिण भारतातील तीन मुस्लिम संघटना, केरळातील नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट इन केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तमिळनाडू मधील मनिथा नीति पासराई यांच्या विलयातून स्थापना करण्यात आली. खरंतर केराळातील कोझिकोड मध्ये नोव्हेंबर २००६ मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तेथे तीन संघटनांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला होता. पीएफआयच्या गठनाची औपचारिक घोषणा १६ फेब्रुवारी २००७ मध्ये एम्पॉवर इंडिया कॉन्फ्रेंन्स दरम्यान बंगळुरुतील एका रॅलीमध्ये केली होती.

PFI
PFI

पीएफआय काय काम करते?
स्टुडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया (SIMI) वर बंदी घातल्यानंतर समोर आलेल्या पीएफआयने स्वत: ला अशा एका संघटनेच्या रुपात सादर केले की, जे अल्पसंख्यांक, दलीत आणि उपेक्षितांच्या समुदायाच्या अधिकारांसाठी लढतात. त्यांनी कर्नाटकात काँग्रेस, भाजप आणि जेडीएसच्या कथित जनविरोधी नीतिंसंदर्भात या पक्षांना नेहमीच निशाण्यावर ठेवले. तर या पक्षांनी निवडणूकीच्या काळात एकमेकांवर मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी पीएफआय सोबत मिळवून घेतल्याचे आरोप ही लावले जातात.

पीएफआयने कधीच कोणती निवडणूक लढवली नाही. दरम्यान, ज्या प्रकारे ते हिंदू समुदायामध्ये आरएसएस, वीएचपी आणि हिंदू जागरण वेदिक सारख्या दक्षिणपंथी समूहाद्वारे काम केले जाते. त्याचप्रमाणे पीएफआय सुद्धा मुस्लिमांमध्ये सामाजिक आणि इस्लामिक धर्माच्या कार्यासंबंधित काम करतात. पीएफआयन आपल्या सदस्यांचा रेकॉर्ड दाखवत नाही आणि याच कारणामुळे या संघटनेशी जोडलेल्या लोकांना अटक केल्यानंतर ही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना गुन्हे रोखणे कठीण होते.

हे देखील वाचा- ब्रु करार नक्की काय आहे? जाणून घ्या सविस्तर

PFI मधून निघालेला SDPI काय आहे?
२००९ मध्ये, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) नावाची एक राजकिय संघटना मुस्लिम, दलित आणि अन्य उपेक्षितांच्या समुदायाचे राजकीय मुद्दे उचलून धरण्याच्या उद्देशाने पीएफआय मधून बाहेर पडत एका नव्या संघटनेच्या रुपात समोर आले. एसडीपीआयचे असे म्हणणे आहे की, त्यांचे उद्देश मुस्लिम, दलित, मागास वर्ग आणि आदिवासींसह अन्य नागरिकांची प्रगती आणि समान विकासाचे आहे. या व्यतिरिक्त सर्व नागरिकांच्या मध्ये योग्य रुपात सत्तेत शक्ती वाटून घेण्याचा त्यांचा हेतू आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.