Home » सरकारकडून PF वरील व्याजात वाढ

सरकारकडून PF वरील व्याजात वाढ

by Team Gajawaja
0 comment
PF Interest Rate
Share

कर्मचारी भविष्य निधी संघटनेसाठी कमाईच्या दृष्टीने याआधीचे वर्ष उत्तम होते. ईपीएफोचे उत्पन्न वाढले. तर ईपीएफओ तुमचे फंड काही ठिकाणी गुंतवणूक करते. जेथून त्यांना रिटर्न्स मिळतात. या कमाईच्या माध्यमातून ईपीएफओ तुम्हाला गुंतवणूकीवर व्याज देते.पीएफ खातेधारकांना दिलासा देणारी बातमी सरकारने दिली आहे. कारण कर्मचारी भविष्य निधी संगठनेच्या ट्रस्टने सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (PF Interest Rate)

आता ईपीएफओच्या ७ कोटींहून अधिक खातेधारकांना ८.१५ टक्के व्याज मिळणार आहे. न्यूज एजेंसी पीटीआयच्या मते ईपीएफच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीडच्या दोन दिवसीय बैठकीनंतर पीएफच्या व्याज दरात ०.५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात व्याज दर ८.१० टक्के होता. जो आता ८.१५ टक्के झाला आहे. यापूर्वी पीएफचे व्याजदर सर्वात कमी १९७७-७८ मध्ये ८ टक्के होता.

असे नव्हे की, ईपीएफचे ट्रस्टीज यांच्या घोषणेनंतर पीएफ खात्यावर नवे व्याजदर लागू केले जातील. यासाठी सरकारची मंजूरी मिळणे सुद्धा फार महत्वाचे आहे. २०२२-२३ च्या आर्थिक वर्षासाठी ठरवण्यात आलेल्या व्याज दराची समीक्षा अर्थमंत्रालयाकडून केली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. दरम्यान, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या व्याजाचे पैसे आता पर्यंत पीएफ खातेधारकांना मिळालेले नाहीत.

असा प्रयत्न केला जात आहे की, यावेळी सुद्धा पीएफ खातयावर व्याज दर पुन्हा एकदा कमी करुन ८ टक्के केला पाहिजे, मात्र ट्रस्टीज यांना असे वाटत आहे की, महागाई पाहता खातेधारकांना अधिक व्याज दिले पाहिजे. बैठकीत पहिल्या दिवशी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव आणि ट्रस्टीज यांच्यामध्ये हायर पेंन्शनच्या मुद्द्यावरुन बातचीत झाली. यामध्ये अशी माहिती दिली गेली की, ईपीएफओ योग्य सब्सक्राइबरला हायर पेंन्शन देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.(PF Interest Rate)

हे देखील वाचा- रोख रक्कमेने व्यवहार करत असाल तर व्हा सावध! इनकम टॅक्स विभागाकडून येऊ शकते नोटीस

पीएफचा व्याजदर आर्थिक वर्ष २०१८-१९ नंतर सातत्याने कमी होत चालला आहे . गेल्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.१० टक्के केल्यानंतर सरकारच्या ४५० कोटी रुपयांची बचत झाली. असे वाटत आहे की, यंदाच्या वर्षात ही ऐवढे व्याज मिळणार की कमी म्हणजेच ८ टक्के केला जाईल. २०१८-१९ मध्ये पीएफवर व्याज दर ८.६५ टक्के होता जो २०१९-२० मध्ये ८.५० टक्के केला होता. २०२०-२१ मध्ये व्याज दर ऐवढाच होता. तर २०२१-२२ मध्ये तो कमी करुन ८.१० टक्के केला गेला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.