देशाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला. त्यावेळी त्यांनी प्रोविडेंट फंड संबंधित नियमात काही बदल केले आहेत. ईपीएफओ युजरला खाते सुरु करुन पाच वर्ष पूर्ण झाली नसतील तर ते आपल्या खात्यातून पैसे काढत असेल तर त्याता आता टॅक्स द्यावा लागणार आहे. पाच वर्षानंतर रक्कम काढल्यानंतर टीडीएस कापला जाणार नाही. पाच वर्षापूर्वी पीएफ खात्यातून काढलेल्या पैशांवर टीडीएस लागणार आहे. ऐवढेच नव्हे तर २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक पीएफ कॉन्ट्रीब्युशन टॅक्स अंतर्गत येणार आहे. (PF account rules)
अर्थसंकल्पात टीडीएस संबंधित काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून १ एप्रिल २०२३ नंतर पैसे काढले तर तुम्हाला ३० टक्क्यांऐवजी २० टक्के टीडीएस द्यावा लागेल. भले ही तुमचे खाते पॅन कार्डला लिंक असो किंवा नसो. तुम्ही १ एप्रिल २०२३ पूर्वी ईपीएफ मधून पैसे काढले तर तुम्हाला आधी प्रमाणेच टीडीएस द्यावा लागेल.
५ वर्षानंतर लागत नाही टीडीएस
जर एखादा खातेधारक ५ वर्षाआधीच पैसे काढत असेल तर त्याला टीडीएस भरावा लागतो. तसेच ५ वर्षानंतर पेसै काढल्यानंतर कोणताही टीडीएस लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात माहिती दिली होती की, टीडीएससाठी १० हजार रुपयांची मर्यादा सुद्धा हटवली गेली आहे.
अशा पद्धतीने समजून घ्या नियम
लाइव मिंटच्या रिपोर्टनुसार, तज्ञ असे सांगतात जर पॅन आधाराशी लिंक केले नसेल तर पीएफ किंवा ईपीएफ खाते सुरु केल्यानंतर पैसे काढल्यास कर द्यावा लागणार आहे. जर पीएफ खाते, खातेधारकाच्या पॅन कार्ड संबंधित जोडले असेल तर काढलेल्या रक्कमेवर कोणताही टीडीएस लावण्यात येणार नाही. जी रक्कम पीएफ मधून काढली जाणार ती त्या वर्षातील खातेधारकाच्या एकूण कर योग्य उत्पन्नासंबंधित जोडली जाईळ. त्यावर पीएफ खआतेधारकाला आयकर स्लॅब नुसार कर द्यावा लागणार आहे. (PF account rules)
हे देखील वाचा- १ मार्च पासून सोशल मीडियात नवे नियम, ऑनलाईन तक्रार करता येणार
तसेच पीएफ खाते खातेधारकाच्या पॅन कार्ड संबंधित जोडले नाही तर त्याच्या पीएफ खात्यात असलेल्या रक्कमेवर टीडीएस कापले जाते. सध्या टीडीएसचा दर ३० टक्के आहे. जो १ एप्रिल नंतर २० टक्के होणार आहे.