Home » दारुचे उदाहरण देऊन केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर केला वार

दारुचे उदाहरण देऊन केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारवर केला वार

by Team Gajawaja
0 comment
Hardeep Singh Puri
Share

पेट्रोल-डिझेल दरासंदर्भात काल, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्राकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. केंद्राने उत्पादन शुल्क कपात करून आपले काम केले. परंतु काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली नाही म्हणून त्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले नाहीत असे म्हणत मोदींनी थेट बिगर भाजपशासित राज्यांवर निशाणा साधला  होता. आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी व्हॅट कपात न केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि राजस्थान सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्र सरकारला केला सवाल

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग (Hardeep Singh Puri) पुरी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार इंधनावरील कराच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करत आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांनी मूल्यवर्धित (Value-added tax) करात कपात करावी. आकडेवारी मोजत त्यांनी महाराष्ट्र सरकारला प्रश्न केला की, राज्य सरकारने २०१८ पासून इंधन कर म्हणून ७९ हजार ४१२ कोटी रुपये जमा केले आहेत आणि यावर्षी ३३ हजार कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. अशावेळी महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यसरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट का कमी केला नाही?

Hardeep Singh Puri

पुढे पेट्रोलियम मंत्री (Hardeep Singh Puri) म्हणाले की, बिगर भाजपशासित सरकारने जनतेला महागडे पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. दारुचे उदाहरण देत ते म्हणाले की, या सरकारने आयात केलेल्या दारुऐवजी इंधनावरील करात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होईल. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर ३२.१५ रुपये आणि काँग्रेसशासित राजस्थान सरकारने २९.१० रुपये प्रति लिटर शुल्क लावले आहे, मात्र दुसरीकडे भाजपशासित उत्तराखंडमध्ये केवळ १४.५१ रुपये आणि उत्तर प्रदेशमध्ये १६.५० रुपये शुल्क आहे. (Hardeep Singh Puri)

=======

हे देखील वाचा – लष्करी कुटुंबात जन्मलेल्या, मॉडेलिंग-अभिनयापासून ते राजकारणापर्यंत…असा आहे नवनीत राणांचा प्रवास
=======

आंध्र प्रदेश-मुंबईत सर्वात महाग पेट्रोल

आंध्र प्रदेश (१२१.४०), महाराष्ट्र (१२०.५१) आणि तेलंगणा (११९.४९) या तीन राज्यांमध्ये पेट्रोलचे सर्वाधिक दर आहेत. मात्र आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक १२०.५१ रुपये आणि डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.१२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. तसेच चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. (Hardeep Singh Puri)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.