Home » ‘या’ ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदी, पण का?

‘या’ ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदी, पण का?

by Team Gajawaja
0 comment
Petrol diesel vehicles banned
Share

अमेरिकेतील राज्य कॅलिफोर्निया मध्ये एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कारण येथे येत्या काळात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांच्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कॅलिफोर्नियाचा असा प्लॅन आहे की, वर्ष २०३५ पर्यंत पेट्रोल-डिझेल किंवा त्या संबंथधित सर्व फॉसिल फ्यूलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घातली जाईल. त्यानंतरच्या वर्ष २०३५ पासून कॅलिफोर्नियात झिरो इमिशन व्हेईकल्सची विक्री केली जाईल. कॅलिफोर्नियात सातत्याने झिरो इमिशन व्हेईकल्सच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी विक्री करण्यात येणाऱ्या कार १६ टक्के अधिक झिरो इमिशनवाल्या असणार आहेत.(Petrol diesel vehicles banned)

कॅलिफोर्निया नव्हेच तर युरोप संसदेत सुद्धा खासदारांनी २०३५ पर्यंत नव्या CO2 उत्सर्जक वाहनांवर पूर्ण बंदीच्या युरोपीय आरोगाच्या प्रस्तावाचे समर्थन केले होते. भारतात वाहन बाजारावर नजर ठेवण्यासाठी लोकांचे असे मानणे आहे की, भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या वाहनांच्या तुलनेत EV ची विक्री अधिक होईल.

तर अमेरिका आणि युरोपियन देशांप्रमाणेच भारतात सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो की नाही. मात्र काही काळापूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी असे म्हटले होते की, सरकार डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबण्याची कोणतीही योजना बनवत नाही आहे. दरम्यान हे सुद्धा सत्य आहे की, केंद्र सरकार भारतात इलेक्ट्रिक वाहने वेगाने आणि व्यापक रुपात वापरण्यासह ऑप्शनल इंधन जसे इथेनॉल, बायो-एलएनजी, ग्लीन हाइड्रोडनच्या वापराच्या दिशेने जोर देत आहे.

Petrol diesel vehicles banned
Petrol diesel vehicles banned

पेट्रोल-डिझेलची वाहन पूर्णपणे बंद होणार?
आपल्या देशात प्रदुषण ही एक मोठी समस्या आहे. या प्रदुषणात वाहनांमधून निघणारा धुर हे एक मोठे कारण आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील सरकार सुद्धा या संबंधित चिंतेत आहेत. सरकारकडून प्रदुषण कमी करण्यासाठी काही पावले सुद्धा उचलण्यात आली. दरम्यान, रस्त्यांवरुन धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांचे प्रदूषण तपासून पाहणे हे सरकारसाठी थोडे मुश्किल आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांचा प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या कारवर पूर्णपणे बंदी घातली जाऊ शकत नाही. कारण त्यांचे भविष्य हे अधिक वर्ष नसते.(Petrol diesel vehicles banned)

हे देखील वाचा- गाड्यांच्या टायरचा रंग हा काळाच का असतो?

काय आहे इलेक्ट्रिक व्हेईकलचे भविष्य?
एका सामान्य वाहनाची अपेक्षा ही इलेक्ट्रिव गाडी चालवणे आणि मेंन्टेनन्सच्या तुलनेत स्वस्त पडते. एक इलेक्ट्रिक गाडी ही पेट्रोल-डिझेलच्या वाहनाच्या अपेक्षेपेक्षा इंधन किंवा उर्जा आणि मेंन्टेनन्ससाठी खुप कमी खर्च देते. खरंतर ईव्हीमध्ये गॅसोलीन इंजिनच्या तुलनेत चालणारे हिस्से कमी असतात. ते ट्रांन्सपोर्टचा एक उत्तम आणि स्वच्छ पद्धत देतात. भारतातील रस्त्यांवर ही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यात लाखो बॅरल तेलाच्या मागणीत घट होऊ शकते. या व्यतिरिक्त भारत सरकारने ईवीला प्रमोट करण्यासाठी काही प्रयत्न ही केले आहेत. नीति आयोगाचे असे म्हणणे आहे की, २०३० पर्यत भारतात ८० टक्के दुचाकी आणि तिनचाकी, ४० टक्के बस आणि ३०-७० टक्के कार या इलेक्ट्रिक वाहनाच्या असतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.