बाइट, मेगाबाइट आणि गीगाबाइट बद्दल लोक खुप चर्चा करतात. या शब्दांना तुम्ही स्पष्टपणे एमबी (MB) आि जीबी (GB) नावाने ओळखत असाल. कोणत्याही रुपातील डेटा असो तो एमबी आणि जीबी मध्ये मोजला जातो. याची बेसिक युनिट बाइट असते. तुम्ही असे समजू शकता की, लांबी मोजण्यासाठी मीटर, किलोमीटरचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे डेटा मोजण्यासाठी एमबी, जीबी आणि टीबीचा वापर केला जातो. या गोष्टींबद्दल तुम्ही खुप काही ऐकले असेल. परंतु तुम्हाला माहिती आहे का १ जीबी-टीबी म्हणजेट टेराबाइटमध्ये कसा बदल होतो. जसे माणसाच्या मेंदूत सुद्धा काही गोष्टी साठवल्या जातात.त्यामुळे तुमचे डोके ही किती जीबीचे असेल बरे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.(petabyte)
पेटाबाइट म्हणजे काय?
पेटाबाइट(petabyte) डेटाचा युनिट आहे. सध्या या टर्मचा अधिक वापर केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा स्टोर करता येतो. एक पेटाबाइट डेटा स्टोर करण्यासाठी तुम्हाला ७४.५ कोटींहून अधिक फ्लॉपी डिस्कची गरज पडेल. किंवा तुम्ही हा डेटा १५ लाख सीडी रोम डिस्कमध्ये स्टोर करु शकता. हे दोन्ही ही पेटाबाइट स्टोर करण्याचे अगदी सोप्पे मार्ग आहेत. परंतु कल्पना करु शकतो की, हा डेटा किती मोठा असेल. अवतार सिनेमात तुम्ही पाहिले असेल की, या सिनेमात मोठ्या स्तरावर ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- WhatsApp वर BAN झालायात? ‘या’ ट्रिक्सचा करा वापर
किती असतो पेटाबाइट?
संपूर्ण सिनेमाचे ग्राफिक्स रेंडर करण्यासाठी १ पीबी स्टोरेजची गरच पडली होती. रिपोर्ट्सनुसार, मानवाच्या मेंदूत २.५ पेटाबाइट मेमोरी असते. या स्पेसमध्ये तुम्ही ३.४ वर्षापर्यंत सातत्याने फुल एचडी रेकॉर्डिंग करु शकतात. वर्ष २०१८ च्या अखेरीस Wayback machine मध्ये २५ पेटाबाइट डेटा स्टोर केला जाऊ शकत होता. एक पेटाबाइट स्टोरेजचा अर्थ असा होते की, आपले संपूर्ण आयुष्य तुम्ही दररोज ४ हजार डिजिटल फोटो क्लिक करु शकता. एक पेटाबाईटमध्ये १०४ टेराबाईट असतात. तर एका टेराबाइट मध्ये १०२४ जीबी असते. रिपोर्ट्सनुसार लायब्रेरी ऑफ काँग्रेसमध्ये २० पेटाबाइपेक्षा अधिक डेटा आहे.
दरम्यान, १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात एक मोठी हार्ड डिस्कला ८० मेगाबाइट मानले जात होते. पण जर आपण एक्साबाइटचा विचार केल्यास हे तर एखाद्या स्वप्नासारखे आहे. कारण जगभरातील वास्तवात डेटा या स्टारवर चालतो. ही अनोखी गोष्ट आहे की, १ ईबी जवळजवळ ७६३ बिलियम फ्लॉपी डिस्क किंवा १.५ अरब सीडी-रोम डिस्कच्या समान डेटा असतो.