बहुतांश लोकांना पाळीव कुत्रा, मांजर पाळण्याची आवड असते. त्यांना ते घरातील सदस्यांप्रमाणे वागवतात. मात्र समस्या तेव्हा येते जेव्हा संपूर्ण घरातील मंडळींना एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे असते. त्यामुळे त्यांना एकटे सोडावे लागते. मात्र काही लोक आपले पेट्स आपल्यासोबत घेऊन जातात. खरंतर तुम्ही सुद्धा पाहिले असेल बहुतांशजण आपले पेट्स परदेशात ही घेऊन जातात. यासाठी तुम्हाला पेट पार्सपोर्ट काढावा लागतो. अन्यथा त्यांना तुम्हाला घेऊन जाता येत नाही. (Pet Passport)
आपण आता पर्यंत व्यक्तीगत पार्सपोर्ट बद्दल ऐकले असेल. मात्र पेट पासपोर्ट म्हणजे नक्की काय हे पाहूयात. त्याचसोबत कोणत्याही पाळीव प्राण्याला आपल्यासोबत घेऊन जाताना तो का लागतो याच बद्दल ही सविस्तर जाणून घेऊयात.
दरम्यान, नुकत्याच वाराणसी मधील अशाच प्रकारच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरुयं. येथील गल्ल्यांमध्ये फिरणारा मोती नावाचा कुत्रा आता वाराणसी ते इटली असा प्रवास करणार आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये इटालियन लेखक वारा लेजारेटी यांनी त्याला आपला पाळीव कुत्रा मानले आहे. त्याचे प्रशिक्षण आणि आवश्यक कागदपत्रांचे काम पूर्ण झाले आहे. त्याचसोबत त्याचा पासपोर्ट ही तयार करण्यात आला आहे.जो मोतीसाठी फार महत्वाचा आहे.
पेट पासपोर्ट म्हणजे नक्की काय?
जर तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्याला परदेशात घेऊन जायचे असेल तर तुमच्याकडे पेट पासपोर्ट असणे गरजेचे आहे. हे एक असे कागदपत्र आहे ज्यामध्ये पाळीव प्राण्याबद्दल सर्व माहिती दिली जाते. यामागील मुख्य उद्देश असा की, दोन्ही देशांमध्ये प्राण्याचा प्रवास हा आरामदायी होणे. काही देशांत प्राण्यांसाठी अधिकृत पासपोर्टची गरज भासत नाही. मात्र त्यांना संबंधित देशाला आपल्या पाळीव प्राण्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच काही कागदपत्र ही सादर करावी लागतात.
कसा असतो पासपोर्ट?
तो एका लहान पुस्तकाप्रमाणे असू शकतो. यामध्ये सर्वात महत्त्वपू्र्ण गोष्ट म्हणजे माइक्रोचिपचा क्रमांक. जो परदेशात प्रवासासाठी तुमच्या पाळीव प्राण्याच्या गळ्यात किंवा गरज भासल्यास त्याच्या त्वचेच्या आतमध्ये लावला जातो. ही त्याची मुख्य ओळख असते. या व्यतिरिक्त पासपोर्टवर तुमच्या पाळीव प्राण्याला रेबीजचे इंजेक्शन कधी आणि किती दिवसांपूर्वी दिले गेले आहे याची सुद्धा माहिती असते. खास गोष्ट अशी की, हा पासपोर्ट केवळ पशूचिकित्सकच देऊ शकतात. (Pet Passport)
पेट पासपोर्टसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या अटी
-पेट पासपोर्ट तयार करण्यामधील पहिली अट अशी त्याला माइक्रोचिप लावावी लागते
-रेबीज इंजेक्शन दिल्याची संपूर्ण माहिती
-पिस्सू आणि अन्य किटाणूंच्या उपचारावरील प्रमाण पत्र
-पशू चिकित्सकांकडून पुष्टी करण्यात आलेले प्रमाण पत्र
हेही वाचा- पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला तुरुंगवास होणार…
भारतात परदेशातून आणल्या जाणाऱ्या प्राण्यासाठी काय आहेत नियम?
-परदेशातून जरी तुम्ही पाळीव प्राणी आणत असाल तरीही माइक्रोचिप लावलेली असावी
-जर एखादा पर्यचक आपल्या सोबत अस्थायी रुपात आपले पेट सोबत घेऊन येत असेल तर त्याला विदेश व्यापार महानिर्देशालयाकडून परवाना घ्यावा लागतो
भारतातील एन्ट्रीपूर्वी ३१ दिवस आधी त्याच्या रेबीजचे इंजेक्शन दिलेले असावे
-जर तुमचे पेट कार्गोच्या माध्यमातून येत असेल तर कमीत कमी ३० दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला त्याला घ्यायला जावे लागते