व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने अटक केली आहे. सर्वत्र अमेरिकन सैन्यानं ज्या पद्धतीनं मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली, त्याची चर्चा होत आहे. सोबतच पेरूमधील एका जादुगाराची भविष्यवाणीही चर्चिली जात आहे. मादुरो यांना अटक झाली, त्यापूर्वीच अगदी पाच दिवस या पेरुव्हियन जादूगारांनी मादुरोच्या पतनाची भविष्यवाणी केली होती. या जादूगारांने डोनाल्ड ट्रम्पच्या भूमिकेचा आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला होता. अगदी पाच दिवसांनी त्यांनी मादुरो यांच्यासंदर्भात केलेली भविष्यवाणी सत्यात उतरली आहे. “ट्रम्प त्याला काढून टाकतील…” हे त्या जादुगाराचे शब्द होते. व्हेनेझुएलापासून ४००० किमी अंतरावर असलेल्या या जादुरागारानं आणखी कोणते भाकित सांगतिले आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. पेरुमध्ये या जादुरगाराचा मोठा महिमा आहे. स्थानिक नागरिक त्याला तांत्रिक म्हणूनही ओळखतात, आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य होतो, किंबहूना तो देवाचा शब्द असतो, असे मानले जाते. पेरूची राजधानी लिमा येथील समुद्रकिनाऱ्यावर वर्षाच्या अखेरीस येणारे हे जादुगार तेथील जनजीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातात. ( America and Venezuela War )

व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये गेल्या दोन दिवसामध्ये जी घटना झाली, त्या घटनेचे चित्र त्याआधीच कराकसपासून ४,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर, असलेल्या पेरु देशामध्ये रेखाटण्यात आले होते. पेरुची राजधानी लिमा येथे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक होईल, असे भाकित करण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी, जादूटोणा करणाऱ्या एका तांत्रिकांच्या गटाचा वार्षिक विधी लिमाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाला. यावेळी जमलेल्या या तांत्रिकांनी आगामी वर्षात काय होणार याची भविष्यवाणी केली होती, त्यात मादुरो यांची भविष्यवाणी प्रथम होती, आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मादुरो यांना अटक होईल, त्याच पद्धतीनं ही अटकही झाली आहे. ( America and Venezuela War )
पेरुदेशामध्ये या तांत्रिकांना मोठे महत्त्व आहे. अगदी चित्रविचित्र पोशाख घातलेली ही मंडळी सुरुवातीला भीतीदायक वाटतात, मात्र पेरु देशातील पंरंपरेचे पालन करत हे सर्व तांत्रिक धार्मिक विधी करतात, आणि त्यानंतर देशाचे आणि जगाचे भविष्य सांगतात. या पेरुव्हियन तांत्रिकांना शमन म्हणून ओळखले जाते. बहुधा ही मंडळी निसर्ग आणि आध्यात्मिक शक्तींशी जोडून भविष्यवाणी करतात. याचवेळी ते आजारी व्यक्तिंवरही उपचार करत त्यांना बरं केल्याचा दावा करतात. वर्षाच्या शेवटी सामूहिक भविष्यवाणीसाठी हे सर्व तांत्रिक पेरुव्हियन किनाऱ्यावर एकत्र येतात. त्यांची ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी हजारो पेरुचे नागरिक यावेळी उपस्थित असतात. जागतिक नेते, राजकीय घटना आणि भविष्यातील घटनांबद्दल हे तांत्रिक भविष्यवाणी करतात. त्यासाठी ही मंडळी आत्म्यांशी संवाद साधण्याचा दावा करतात. हा सर्व विधी पेरु देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा भाग मानला जातात. वारा, पाणी आणि जमीन वापरून हे तांत्रिक विशिष्य विधी करतात. यावेळी अनेक लहान मुलांनाही आणण्यात येते. या तांत्रिकांनी त्यांना आशीर्वाद दिल्यावर या मुलांना आरोग्याचे वरदान लाभल्याचे मानण्यात येते. ( America and Venezuela War )
=======
हे देखील वाचा : Nicolas Maduro : व्हेनेझुएलाला अमेरिकेच्या हेरांनी कसे पोखरले
=======
अशाच विधीमध्ये मादुरो यांचे भविष्य काय आहे, हे सांगण्यात आले होते. यापूर्वीही या पेरुच्या तांत्रिकांनी सांगितलेली काही भविष्यवाणी सत्यात उतरली आहे. पेरुचे माजी राष्ट्रपती अल्बोर्टो फुजिमोरी यांच्या मृत्यूच्या बाबतही या तांत्रिकांनी सांगितलेली तारीख खरी ठरली होती. मानवी हक्क उल्लंघनासाठी तुरुंगात असलेले पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फुजिमोरी बारा महिन्यांत मरतील, असे ते भाकित होते. त्याप्रमाणे सप्टेंबर २०२४ मध्ये ८६ व्या वर्षी फुजिमोरी यांचे कर्करोगाने निधन झाले. मात्र त्याचवेळी निकोलस मादुरो यंच्याबाबतीत त्यांनी गेल्यावर्षी मादुरो पळून जातील, ही भविष्यवाणी केली होती, ती अचूक ठरली नाही. त्यामुळेच त्यांनी यावेळी केलेली मादुरो यांच्या भविष्यवाणीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. मात्र पाच दिवसानंतर या तांत्रिकांनी सांगितलेली घटना खरी ठरल्यामुळे त्यांनी अन्य कुठले भाकित केले आहे, याची चौकशी सुरु झाली आहे.
पेरुच्या या तांत्रिकांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही भाकित केले आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत हे युद्ध संपणार असल्याचे भाकित आहे. अर्थात असेच भाकित त्यांनी २०२३ मध्येही केले होते. शिवाय इस्रायल आणि गाझामध्ये युद्धबंदी असूनही अणुयुद्धाचा इशारा दिला होता. तसाच इशारा यावर्षीही असल्यामुळे आता या दोन देशांमध्ये वास्तवात अणुयुद्ध होणार का, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( America and Venezuela War )
सई बने
