एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीवरुन त्याचे व्यक्तीमत्व फार काही सांगून जाते. तुम्ही कशा प्रकारे बोलता हे तुमच्या खासगी आणि करियरच्या लाइफमध्ये फार महत्वाचे असते. हे सुद्धा खरं आहे की, तुम्हाला तुमचे बोलणे इतरांसमोर मांडता आले पाहिजे. परंतु काही वेळेस असे होते की, गपचुप राहणेच शहाणपणाचे असते. या उलट काही लोक बोलण्याची चुक करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या करियर, लाइफ आणि व्यक्तिमत्वावर सुद्धा होते. यामुळे तुम्ही जे काही बोलाल त्याचा आधी विचार करा आणि नंतरच बोला. (Personality Development Tips)
कारण समोरच्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही जे शब्द वापरता ते तुम्ही परत मागे घेऊ शकत नाहीत. त्यावरुनच तुम्हाला पारख केले जाते. काही वेळेस असे होते की, तुम्हाला बोलायचे खुप असते पण व्यवस्थितीत काही गोष्टी मांडता येत नाहीत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काय बोलायचे आहे हे कळत नाही.त्यामुळे अशावेळी आधी समोरच्या व्यक्तीचे गप्प ऐकून घ्या आणि नंतरच त्याला प्रतिउत्तर द्या. यासाठी पर्सनालिटी डेव्हलमेंट फार महत्वाचे असते.
‘या’ ठिकाणी गप्प राहिलेलेच बरे
-जर तुम्हाला खुप राग येत असेल तर गप्प राहण्याचा प्रयत्न करा. अशा स्थितीत फार कमी लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येते. राग हा तुमचे आयुष्य, करियर धोक्यात आणू शकतो.
-जो पर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसेल तो पर्यंत गप्प राहा. अजिबात बोलू नका.
-जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व इतरांसमोर नेहमीच उत्तम ठेवायचे असेल तर विनाकारण बोलू नका.
-आरडाओरड न करता तुम्ही बोला. खासकरुन परस्थिती बद्दल माहिती असले तरीही आधी काही बोलू नका.
-जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या तोंडून अपशब्द निघणार आहेत तर गप्प राहण्याचा प्रयत्न करा.
-जर तुम्ही अधिकच भावनिक होत असाल तरीही गप्प राहणे तुमच्यासाठी उत्तम. (Personality Development Tips)
हेही वाचा- तुमची मुलं शिव्या देण्यास शिकले असतील तर पालकांनी ‘या’ गोष्टी जरुर करा
पर्सनालिटी डेवलमेंट मध्ये कमी बोलणे आणि अधिक ऐकणे हे फार महत्वाचे असते. काही स्थितीत गप्प राहणेच फायद्याचे ठरते. यामुळे तुमच्या बोलण्यात सुधारणा होते. एखाद्या मुद्द्यावर तेव्हाच बोला जेव्हा तु्म्हाला त्याची पूर्ण माहिती असेल. या व्यतिरिक्त जोरात किंवा ओरडून बोलणे टाळा. ही सवय दुसऱ्यांच्या समोर तुमचे इंप्रेशन वाईट करु शकते.