जेव्हा कधी अचनाक अधिक पैशांची गरज भासते तेव्हा बँकेतून कर्ज घेऊन ते काम पूर्ण केले जाते. अशातच बहुतांश लोक पर्सनल लोन घेतात. मात्र काही लोकांचा असा गोंधळ होतो की, सिक्युर्ड लोन की पर्सनल लोन घ्यावे. अशातच याचबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोतच. पण नक्की कोणते कर्ज तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे हे जाणून घेऊयात. (Personal vs Secured loan)
जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचे क्रेडिट स्कोर उत्तम असला पाहिजे. त्याचसोबत सिक्युर्ड कर्जासाठी असे काही करण्याची गरज नाही. सर्वसामान्यपणे ७५० पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर उत्तम मानला जातो. जेवढा अधिक क्रेडिट स्कोर असेल तेवढेच कमी व्याजावर कर्ज मिळेल.
सिक्युर्ड लोन म्हणजे काय?
कर्ज घेण्यासाठी जेव्हा तुम्ही बँकेकडे जेव्हा एखादी संपत्ती जसे की, घर, शेअर्स, म्युचअल फंड गहाण ठेवता आणि त्यावर कर्ज घेतले जाते त्यालाच सिक्युर्ड लोन असे म्हटले जाते. सिक्युर्ड लोन घेण्याचा फायदा असा होतो की, जर तुमची क्रेडिट हिस्ट्री नसेल तरीही बँक तुम्हाला कर्ज देते आणि यावर व्याज ही कमी असते.
पर्सनल लोन म्हणजे काय?
पर्सनल लोन बद्दल बोलायचे झाल्यास तर हे एक अनसिक्युर्ड लोन आहे. त्यामध्ये तुम्हाला काहीही गहाण ठेवायची गरज नसते. तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर कोणतीही बँक तुम्हाला पर्सनल लोन देते. पर्सनल लोनसाठी तुमची क्रेडिट हिस्ट्री महत्त्वाची असते. याचे व्याजदर सुद्धा सिक्युर्ड लोनपेक्षा अधिक असतात.
कोणते कर्ज तुमच्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही दीर्घकाळासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सिक्युर्ड लोन बेस्ट ऑप्शन आहे. या कर्जावर व्याजदर कमी असते आणि फंडिंगची कॉस्ट सुद्धा कमी असते. जर तुम्ही कमी काळासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि काहीही गहाण ठेवायचे नसेल तर तुम्ही पर्सनल लोनचा पर्याय निवडू शकता. (Personal vs Secured loan)
हेही वाचा- वरिष्ठ नागरिकांना मिळतात ‘या’ सुविधा
कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा
कर्ज घेण्यापूर्वी तु्म्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्याचे नियम आणि अटींकडे लक्ष द्यावे. त्याचसोबत कर्ज घेण्यावेळी नेहमीच चार ते पाच बँकांचे व्याजदरांची तुलना करावी. त्यानंतरच कर्ज घेण्याचा निर्णय घ्यावा. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर ७५० पेक्षा अधिक ठेवावा. जेणेकरुन सहज कर्ज मिळेल. यामुळे तुमचा व्याजदर ही कमी राहिल.