Personal Loan Tips पर्सनल लोन अशी एक सुविधा आहे ज्यामध्ये कठीण काळात पैशांच्या माध्यमातून काही गणिते सुटू शकतात. यासाठी क्रेडिट स्कोर उत्तम असणे अनिवार्य असते अशी अट आहे. पण क्रेडिट स्कोर कमी किंवा बिघडलेला असेल तर कर्ज दिले जात नाही. खरंतर, 600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर असणाऱ्यांना कर्ज मिळत नाही. याशिवाय 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर असेल तर सहज कर्ज मिळू शकते. पण बिघडलेल्या क्रेडिट स्कोरच्या जोरावरही पर्सनल लोन कसे मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया.
क्रेडिट स्कोर जाणून घ्या
कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोर जाणून घ्या, जेणेकरुन तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती कळू शकते. याशिवाय क्रेडिट स्कोर कळल्यानंतर कर्जासाठी मंजूरी मिळेल की नाही हे देखील स्पष्ट होईल.
कर्ज संस्थांना संपर्क करा
भारतात काही संस्था अशा आहेत ज्या क्रेडिट स्कोर बिघडला असला तरीही कर्ज देतात. पण कर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला अधिक व्याजदर द्यावा लागतो.

Personal loan
सुरक्षित कर्जाचा फायदा घ्या
क्रेडिट स्कोर बिघडला असल्यास सिक्युअर्ड पर्सनल लोनचा पर्याय तुमच्याकडे आहे. यासाठी एखादी संपत्ती, गाडी, एफडी या गोष्टी गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता. पण कर्जाच्या रक्कमेची परतफेड न केल्यास गहाण ठेवलेल्या गोष्टींना हातधुवून बसावे लागते.
को-अॅप्लिकेंट
तुमच्याकडे एक को-अॅप्लिकेंट किंवा गॅरंटर असल्यास तर एका उत्तम क्रेडिट स्कोर तुम्हाला कर्ज मिळून देऊ शकतो. यामध्ये अट अशी की, तुम्ही कर्जाची रक्कम न फेडल्यास को-अॅप्लिकेंट किंवा गॅरंटरला कर्ज फेडावे लागू शकते.(Personal Loan Tips)
=======================================================================================================
हेही वाचा :
K. M. Cariappa शौर्य आणि पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे फील्डमार्शल के. एम. करिअप्पा
Indonesia : नुसंतारा नव्या राजधानीची इंडोनेशियाला का गरज भासली !
=======================================================================================================
क्रेडिट स्कोर सुधारण्याकडे ल द्या
क्रेडिट स्कोर सुधारल्याने भविष्यात लागणाऱ्या कर्जासाठी लगेच मंजूरी मिळू शकते. पण यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
स्टेबल इन्कम प्रूफ द्या
वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देऊ करतील. पण यावेळी स्टेबल इन्कम प्रूफ द्यावे लागू शकते. यासाठी सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इन्कम टॅक्स रिटर्न अशी कागदपत्रे दाखवावी लागू शकतात.
शॉर्ट टर्म लोनबद्दल विचार करा
सर्वसामान्यपणे शॉर्ट टर्म लोनमध्ये लहान रक्कमेचे कर्ज घेण्यासह फेडण्यासाठी कमीच कालावधी असतो. यामुळे क्रेडिट स्कोर खराब असणाऱ्यांनाही काही वित्तीय संस्था शॉर्ट टर्म कर्ज देऊ करतात.