आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काही वेळेस पर्सनल लोन घेतो. बहुतांश वेळा असे दिसून येते की, बँकेत पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. परंतु या सर्वांमधून सुद्धा तुमची सुटका होऊ शकते. ती म्हणजे पॅन कार्डच्या माध्यमातून पर्सनल लोन घेणे. बहुतांश बँका या तुमच्या पॅन कार्डच्या माहितीनुसार तुम्हाला ५० हजार रुपयांपर्यतचे पर्सनल लोन देते. कर्ज देणारी एनबीएफसी बजाज फिनसर्व यांच्या मते, केवायसी नियमाअंतर्गत तुम्ही तुमचे पॅन कार्ड देऊन कोणत्याही समस्येशिवायस पर्सनल लोन मिळवू शकता. हा मार्ग तुमची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सोप्पा असेल. परंतु बँकेकडून तुमची क्षमता, पगार आणि कर्जफेड करण्याचा कालावधी पाहून कर्जाची रक्कम ही कमी किंवा वाढवू शकते.(Personal loan on pan card)
कोणत्याही कोलॅटरलची गरज भासत नाही
पॅन कार्डच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला बँकेकडे काही कोलॅटरल म्हणून ठेवण्याची गरज भासत नाही. म्हमजेच बँक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण न ठेवून घेता तुम्हाला पर्सनल लोन देते. दरम्यान, पॅन कार्डच्या आधारावर दिले जाणारे पर्सनल लोन हे सुद्धा असुरक्षित कॅटेगरीत येते. याच कारणास्तव बँकेकडून तुम्हाला कर्जाची मोठी रक्कम दिली जात नाही.
हे देखील वाचा- एखाद्यासाठी Loan Guarantor रहाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
पैसे खर्च करण्यासंदर्भात कोणताही नियम नाही
होम लोन असो किंवा ऑटो लोन प्रत्येक प्रकारचे कर्ज फेडण्यासाठी तुम्ही यामधील रक्कम वापरु शकता. बँक तुम्हाला पॅन कार्डच्या आधारावर दिल्या गेलेल्या रक्कमेसंदर्भात कोणताही नियम लागू करत नाही. म्हणजेच तुम्ही तुमचे काही खासगी लोन किंवा खासगी खर्च असतील ते सुद्धा या पैशांमधून करु शकता.(Personal loan on pan card)
‘या’ नियमाची पुर्तता करावी लागते
पॅन कार्डच्या आधारावर कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सादर करावी लागतात. त्यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव याचा सुद्धा समावेश केला जातो. पॅन कार्डवर पर्सनल लोन मिळवण्यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे फार महत्वाचे आहे. अर्जदार हा सेल्फ इम्प्लॉइड असो किंवा नोकरी करणारा असो. या दोन्ही परिस्थितीत त्याचा क्रेडिट स्कोर उत्तम असला पाहिजे.
तर प्रत्येक बँकांकडून पर्सनल लोन देण्यासाठी वेगवेगळे व्याजदर लावले जातात. अशातच तुम्ही पॅन कार्डच्या माध्यमातून पर्सनल लोन घेत असाल तर प्रथम त्या संदर्भातील संपूर्ण माहिती बँकेकडून घ्या. त्यानंतरच पॅन कार्डच्या आधारावर तुम्ही पर्सनल लोन घेण्याचा विचार करा. आणखी महत्वाचे म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर हा नेहमीच उत्तम कसा राहिल याकडे सुद्धा लक्ष द्या.