Home » Money : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि पैशाची कमतरता दूर करा

Money : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा आणि पैशाची कमतरता दूर करा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Money
Share

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज आहे. आपल्या गरजा, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी प्रयत्नशील असते. मात्र सगळे जणं चांगला जॉब करत भरपूर पैसा कमवत असले तरी एक समस्या सर्वांनाच असते आणि ती म्हणजे, कितीही पैसे कमावले तरी बचत होतच नाही आणि पैसे खर्च होतात. अनेक उपाय करून देखील पैशांची बचत होत नाही. मग अशावेळी पैसे वाचवण्यासाठी आणि उत्तम बचत होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. (Marathi News)

पैसे वाचवण्यासाठी भारतातील महान विचारवंत असलेल्या आचार्य चाणक्य यांनी काही सोप्या क्लृप्त्या सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, कूटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ निव्वळ ग्रंथ नाही तर मनुष्यच्या आयुष्यातील सर्वच लहान मोठ्या प्रश्नांचे उत्तर आहे. कारण या ग्रंथामध्ये आयुष्य जगताना मनुष्याला मार्गदर्शक ठरतील अशी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. या व्यक्तीने आदर्श जीवन जगण्यासाठी काय करावे?, आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नये? आदी अनेक सर्वच प्रश्नांची उत्तरं सांगितली आहेत. याच ग्रंथामध्ये मनुष्याने त्याच्या जीवनात अर्थ नियोजन उत्तम पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन केले आहे. चाणक्य नीतीमध्ये आर्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगिओतल्या आहेत, ज्यांचा वापर करून आपण पैशाची कमतरता पूर्ण करून बचत करू शकतो. (Todays Marathi News)

चाणक्यनीती सांगते, की कोणीही व्यक्ती घरबसल्या श्रीमंत होऊ शकत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. शिस्त बाळगल्याशिवाय व्यक्तीला आयुष्यात कधीच यश मिळू शकत नाही. त्यामुळे मेहनत आणि शिस्त या गोष्टी पैसे कमवण्यासाठी अत्यावश्यक आहे.
> चाणक्यनीती सांगते, की पैशांची बचत करून त्याचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य गोष्टीसाठी करा.
> जो माणूस व्यवस्थित विचार करून पैसा खर्च करत नाही, त्याला बुद्धिहीन अर्थात मूर्ख म्हटले जाते. (Top Marathi News)

Money
> पैशांची बचत केल्याने कोणीही श्रीमंत होऊ शकते, अशा व्यक्तींबद्दलचा समाजातला आदर-सन्मानही कायम राहतो. (Latest Marathi News)
> आर्य चाणक्यांच्या मते, पैसा योग्य मार्गाने कमवायला हवा. चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा हळूहळू संपू लागतो.
> आयुष्यात प्रत्येकालाच पुढे जायचंय आणि यशस्वी व्हायचे आहे. काहींना लवकर यश मिळते, तर काहींना वेळ लागतो. मेहनत आणि चिकाटीने सगळ्या गोष्टी केल्या की त्याचे फळ माणसाला नक्की मिळते. (Top Trending News)

===========

Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

===========

> आचार्य चाणक्यांच्या मते, हुशार व्यक्ती नेहमी भविष्यासाठी नियोजन करतात. तुमच्या भविष्यातल्या नियोजनाची माहिती कोणालाही सांगू नका. तुमचे नियोजन गुप्त राहिले, तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. नियोजन उघड केल्याने कामात यश मिळत नाही. ज्या व्यक्ती आपलं नियोजन गुप्त ठेवतात ते नक्कीच श्रीमंत होतात. (Top Stories)
> नेहमी प्रामाणिकपणे पैसे कमवा. अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा जीवनात अधिक संकट निर्माण करतो. असं म्हटलं जातं की, बेकायदेशीरपणे मिळवलेल्या संपत्तीचे आयुष्य खूप कमी असते. जे फार काळ टिकत नाही. त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.