आपण फिरण्यासाठी विविध ठिकाणं शोधतो. मात्र तेथे जाण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सुद्धा पाहिले पाहिजे. तर परदेशात फिरण्यासाठी आपल्याला वीजाची गरज लागते. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जेथे परमिट शिवाय प्रवास करता येत नाही. भारतातील या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला घ्यावा लागणाऱ्या या परवानगीला ‘इनर लाइन परमिशन’ असे म्हटले जाते. माहितीनुसार, या ठिकाणच्या जवळून आंतरराष्ट्रीय सीमा जातात. त्यामुळेच अशा ठिकाणी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. (Permit for Travel)
एलओसी जवळ असलेल्या लद्दाख मधील काही अशी ठिकाणं आहेत जेथे तुम्हाला जाण्यासाठी परमिट घेणे आवश्यक असते. या ठिकाणांमध्ये नुब्रा घाट, त्सो मोरीरी लेक, खारदुंग ला पाससह काही ठिकाणांचा समावेश आहे. हे परमिट फक्त एका दिवसासाठी मान्य असते.
या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक नागालँड येथे फिरण्यासाठी येतात. मात्र नागालँड मधील कोहिमा, मोकोचुंग, वोखा, दीमापुर, मोन, किफिरे वगैरहवर जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावे लागते. येथे ५ दिवसांचे परमिट ५० रुपये आणि ३० दिवसापर्यंतच्या परमिटसाठी १०० रुपये मोजावे लागतात.
तसेच अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा परमिट घ्यावे लागते. या ठिकाणांमध्ये ईटानगर, तवांग, रोइंग, पासीघाट, भालुकपोंग, बोमडिला, जीरो यांचा समावेश आहे. भूटान, म्यांमार आणि चीनच्या सीमेलगतचे हे राज्य सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याचे मानले जाते. त्याचसोबत त्सोंगमो लेक, गोइचला ट्रॅक, नाथूला, युमथांग, गुरुडोंगमार लेक सारख्या शानदार ठिकाणी परमिट शिवाय जाऊ शकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला परमिट घ्यावेच लागते.(Permit for Travel)
तर लक्षद्वीप येथे खरंतर ३६ बेट आहेत. मात्र १० बेटांवर फिरण्याची परवानगी आहे. भारताच्या भुमीपासून जवळजवळ ३०० किमी दूर अरबी समुद्रात आहे. येथे फिरण्यासाठी प्रत्येकाला इनर लाइन परमिटची आवश्यकता असते. याचा शुल्क केवळ ५० रुपये प्रति अर्ज असा आहे. यासाठी तुम्हाला ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो देणे गरजेचे असते.
हे देखील वाचा- ‘हवाई गार्डन’ थिम असलेल्या टर्मिनलला पसंती
मिजोराम हे भारतातील सर्वाधिक सुंदर राज्यांपैकी एक आहे. येथे ही फिरण्यासाठी पर्यटकांना इनर लाइन परमिट घेण्याची आवश्यकता असते. यासाठी अस्थाई परमिट चार्ज १२० प्रति व्यक्ती आणि स्थाई परमिटचा चार्ज २२० प्रति व्यक्ती आहे. यासाठी तुम्हाला चार पासपोर्ट साइज फोटो आणि कोणतेही एक ओळखपत्र दाखवावे लागते.