फूड डिलिव्हरी ते पार्टनर शोधण्यासाठी, फिटनेसकडे लक्ष देण्यापर्यंत काही अॅप उपलब्ध आहेत. परंतु एक असा अॅप आहे जो केवळ महिलांसाठीच आहे. तो म्हणजे पीरियड ट्रॅकर अॅप. हे अॅप महिलांसाठी फार फायदेशीर आहे. यामुळे तुम्ही बिझी आणि हेक्टिक लाइफ मध्ये याचा वापर अगदी सहज करु शकता. खरंतर हे अॅप पीरियड्स ट्रॅक करण्यासाठीच तयार केले आहे. याचा वापर तुम्ही कधीही आणि कसा ही करु शकता. (Period tracker app)
पीरियड्स येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या मधून प्रत्येक महिलेला महिन्यातून एकदातरी जावेच लागते. अशातच तुम्हाला पीरियड्स ट्रॅक करण्यासाठी अधिक समस्या येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही पीरियड्स ट्रॅकिंग अॅप बद्दल सांगणार आहोत. हे तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोर वरुन डाउनलोड करु शकता.
Period calendar
हे अॅप 100 मिलीयन युजर्सने डाउनलोड केले आहे. याला 4.9 रेटिंग दिली गेली आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे पीरियड्स ट्रॅक करु शकता. तुम्हाला पुढील महिन्यात पीरियड्स कधी येणार हे तुम्हाला याच्या माध्यमातून कळू शकते. यामध्ये तुम्ही रिमांडर सुद्धा लावू शकता. जेणेकरुन तुम्हाला तुमचे पीरियड्स, मेडिसन, हेल्थ रेकॉर्ड ही ठेवू शकता.
My calendar
हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करु शकता. याला 4.8 रेटिंग मिळाली आहे. याला 10 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. पीरियड कॅलेंडर एक फायदेशीर आणि सोप्पे अॅप आहे. जे महिलांना आपले पीरियड्स, साइकल. ओव्युलेशन आणि फर्टाइल डेजवर ही नजर ठेवण्यास हेल्प करतात.
Flo Ovulation & Period tracker
हे अॅप गुगल प्ले स्टोरवर 4.6 रेटिंग मिळाली आहे. 100 मिलियन प्लस लोकांनी हे डाउनलोड ही केले आहे.हे अॅप तुम्हाला तुमच्या साइकलच्या मते लाइफ प्लॅन करते. तुमचे फर्टाइल डेज ही सांगू शकतात, पीरियड्स ट्रॅक करतात आणि तुमच्या शरिरात काय बदल होतायत हे सांगते. (Period tracker app)
हेही वाचा- महिला होतायत Superwomen Syndrome च्या शिकार
Clover- Safe period tracker
या अॅपला 4.5 रेटिंग मिळाली आहे. याला 1 मिलियनपेक्षा अधिक युजर्सने डाउनलोड केले आहे. याच्या मदतीने तुम्ही पीरियड्स ट्रॅक करु शकता. यामुळे तुम्ही हेल्दी लाइफ आणि सोप्पे बनवण्यास मदत होते.