Perfume Buying Tips : उन्हाळा असो अथवा हिवाळा परफ्यूमचा वापर सर्वजण करतात. परफ्यूममुळे मन प्रसन्न राहतेच पण घामाच्या दुर्गंधीपासूनही दूर राहता. बहुतांशजण दीर्घकाळ सुवास येणारा परफ्यूम खरेदी करतात. अथवा एखाद्याने परफ्यूम बद्दलचा सल्ला दिला असल्यास तो खरेदी करतात. पण परफ्यूम खरेदी करताना त्याचा सुवासच नव्हे तर काही गोष्टीही तपासून पाहिल्या पाहिजेत. यासंदर्भातच अधिक जाणून घेऊया…
अॅसिड तपासून पाहा
परफ्यूममध्ये अॅसिड मिक्स केले जाते. अशातच परफ्यूम खरेदी करताना त्यामधील अॅसिडचे प्रमाण तपासून पहावे. कारण एखाद्या अॅसिडमुळे तुमच्या त्वचेचे नुकसान अथवा अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. यामुळे परफ्यूमच्या बॉटलवर लिहिलेली माहिती आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर केलाय हे तपासून पाहा.
रिव्हू पाहा
एखाद्या ब्रँडचा परफ्यूम खरेदी करताना त्याचे रिव्हू नक्की पाहा. जेणेकरुन तुम्ही उत्तम ब्रँडचा परफ्यूम खरेदी करू शकता. परफ्यूमचे उत्तम आणि वाइट गुणधर्म काय आहेत हे देखील पाहा. याशिवाय ऑनलाइन पद्धतीने परफ्यूम खरेदी करत असाल तर आवश्यक त्याचे रिव्हू वाचा.
ऋतू लक्षात घ्या
प्रत्येक ऋतूत परफ्यूमचा वापर केला जातो. खरंतर, ऋतूनुसार तुम्ही परफ्यूम खरेदी करावा. कारण परफ्यूममध्ये ऋतूनुसार गुणधर्म असतात. याशिवाय रेग्यूरल परफ्यूम एखाद्या खास सोहळ्यावेळी लावू नये. पार्टी-फंक्शनसाठी एक वेगळा परफ्यूम खरेदी करावा. (Perfume Buying Tips)
परफ्यूमच्या लॉन्जेविटीकडे लक्ष द्या
तुमचा परफ्यूम किती वेळ टिकून राहतो याची जरुर माहिती घ्या. काही परफ्यूम असे असतात जे काही तासांसाठीच काम करतात. यामुळे परफ्यूम अशा सुवासाचा निवडा जो दीर्घकाळ टिकेल. अथवा त्याचा सुवास दीर्घकाळ तुम्हाला फ्रेश ठेवेल.
आणखी वाचा :
जुन्या साड्यांपासून बनवा नवीन स्टायलिश ड्रेस
मान्सूनमध्ये पिग्मेंटेशनची समस्या दूर करण्यासाठी घरच्याघरी तयार करा हे स्क्रब