दारु पिणे हे आरोग्यासाठी घातक ठरु शकते असा सल्ला आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र काहीजण त्याचा ऐवढा अतिरेक करतात की दारु प्यायल्यानंतर आपण काय करतोय, काय बोलतोय किंवा आपण नीट उभं तरी राहू शकतो का याचे भानच राहत नाही. आपल्याच नशेत ते धुंद होत काहीही बरळत राहतात. आपण बहुतांश वेळा पाहिले असेल की, लोक दारु प्यायल्यानंतर थोडं विचित्रच वागतात. पण काही जण तर दारु प्यायल्यानंतर चक्क बोलतात हे सुद्धा आपण अनुभवले असेल. परंतु असे का होत असेल किंवा यामागे काही कारणं आहेत का याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.(People talk english after drink)
सायन्स मॅग्जीन जर्नल ऑफ साइकोफार्माकोलॉजीमध्ये छापून आलेल्या एका संशोधनानुसार, थोडीशी जरी दारु प्यायल्यानंतर जी नशा येते त्यामुळे दुसरी भाषा बोलण्यास आपल्याला प्रवृत्त करते. युनिव्हर्सिटी ऑफ लीवरपूल, ब्रिटेनचे किंग्स कॉलेज आणि नेदरलँन्ड्समधील युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिच यांच्या संशोधकांनी जवळजवळ ५० जर्मना लोकांच्या समूहावर अभ्यास केला. ज्यांनी नुकतीच डच भाषा शिकली होती आणि ते नेदरलँन्डमघ्ये अभ्यास करत होते. जेथे डच भाषा बोलली जाते.
खरंतर दारु प्यायल्यानंतर आपण पाहतो की, बहुतांश लोकांचा आत्मविश्वास ही अधिक वाढलेला दिसतो. दारुच्या नशेत आपण समोरच्या व्यक्तीला आत्मविश्वासाने आपली गोष्ट सांगू शकतो. जर हिंदी तुमची मातृभाषा असेल तर इंग्रजी ही तुमची दुय्यम भाषा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या समोर इंग्रजी बोलताना घाबरता कारण तुम्हाला चुकलात तर काय होईल असे वाटत राहते. तसेच जे लोक नवी भाषा शिकण्याची भीती वाटते त्यांना दारु ही नवी भाषा बोलण्यास शिकवण्यास मदत करते.

स्मरणशक्ती आणि एकाग्रता प्रभावित होते
परंतु दुसरीकडे, अल्कोहोल स्मृती आणि लक्ष यांच्यावर नकारात्मक परिणाम करते. यामध्ये अतिसंवेदनशीलता आणि आत्म-मूल्यांकनाचा देखील समावेश आहे. त्यामुळे दारु प्यायल्यानंतर लोक खरोखरं इंग्रजी किंवा इतर परदेशी भाषा बोलतात का? की ते बोलण्यासाठी फक्त धैर्याची किंवा आत्मविश्वासाची बाब आहे?
तेव्हा इंग्रजी बोलण्याची भीती निघून जाते
सर्वसाधारणपणे ज्या लोकांना इंग्रजी नीट बोलता येत नाही तो लोक दुसऱ्यांसमोर त्या भाषेत बोलण्यास घाबरतात. परंतु दारु प्यायल्यानंतर तिच लोक कोणत्याही भीतीशिवाय स्पष्टपणे इंग्रजी बोलू लागतात. कारण दारुच्या नशेत त्यांच्यामधील भीती ही निघून गेलेली असते आणि ते खुलेपणाने बोलू लागतात. हे सरळ कारण आहे की, दारु प्यायल्यानंतर इंग्रजी लोक बोलतात.
हे देखील वाचा- अनोखे क्लिनिक! विचित्र कपड्यांमध्ये राहतात कर्मचारी आणि डॉक्टर
या गोष्टीवर करण्यात आले संशोधन
जी लोक दारु पिणे पसंद करत नाही ते लोक एखाद्या समोर बोलताना कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर बोलण्यास संकोच व्यक्त करतात. मात्र तिच लोक थोडीशी जरी दारु प्यायले तर त्यांचा व्यावहारिक संकोच हा आपोआप दूर होतो आणि ते खुलेपणाने बोलतात. म्हणजेच असे नव्हे की, तुम्ही सर्व कामे ही दारु पिऊनच केली पाहिजेत. आपण जसे आधीच पाहिले दारु ही आरोग्यासाठी घातकच आहे. पण ती प्यायल्यानंतर लोक इंग्रजी का बोलतात हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.(People talk english after drink)
खरंतर इंग्रजी भाषेत असे काही कठीण शब्द असतात त्यांचा नीट उच्चार करता येत नाही. परंतु अभ्यासात असे दिसून आले की. ज्या व्यक्तींना नीट शब्द उच्चारता येत नाही ती लोक दारु प्यायल्यानंतर तेच शब्द व्यवस्थितीत उच्चारतात. त्याचसोबत ज्या लोकांचे इंग्रजी किंवा अन्य भाषा बोलणे हे आव्हानात्मक वाटते, ती लोक सुद्धा दारु प्यायल्यानंतर स्पष्टपणे बोलू लागतात. हे संशोधन जर्मन आणि डच लोकांवर करण्यात आले. परंतु तुम्ही हे इंग्रजी आि हिंदी मध्ये सुद्धा तसेच होत असल्याचे पाहू शकता.
कशा पद्धतीने करण्यात आले संशोधन?
या संशोधनात सहभागी झालेल्या काही लोकांना दारु दिली तर काहींना असे ड्रिंक देण्यात आले ज्यामध्ये अल्कोहोल नव्हते. त्यानंतर त्या लोकांना एकमेकांसोबत डच भाषेत बोलण्यास सांगितले. तेव्हा जे लोक दारु प्यायले होते त्यांचे शब्द हे अधिक स्पष्टपणे बोलत होते. तर ज्या लोकांनी फक्त ड्रिंक घेतले होते ती लोक दारु प्यायलेल्या लोकांच्या तुलनेत काही बोलण्यास घाबरत होते.