Home » पेले Vs माराडोना, कोण आहे फुटबॉलचा GOAT?

पेले Vs माराडोना, कोण आहे फुटबॉलचा GOAT?

by Team Gajawaja
0 comment
Pele Vs Diego Maradona
Share

ब्राजीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. पेले यांच्या निधनापूर्वीच्या दोन वर्षाआधी २५ नोव्हेंबर २०२० रोजी फुटबॉल जगताला असाच एक मोठा धक्का बसला होता. जेव्हा पेले यांच्यासारखेच महान फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांचे निधन झाले होते. फुटबॉलप्रेमींमध्ये नेहमीच स्पर्धा असायची की, या दोघांमध्ये कोण उत्कृष्ट खेळाडू आहे.तर याचबद्दल अधिक जाणून घेऊयात. (Pele Vs Diego Maradona)

फुटबॉलच्या जगतात आठवणीत राहणारा हा सामना
ब्राजीलचे पेले आणि अर्जेंटीनाचे डिएगो माराडोना हे दोघे ही त्यांच्या काळातील सर्वाधिक उत्तम खेळाडू होते. तरीही नेहमीच त्या दोघांमध्ये तुलना केली जायची. माराडोना यांनी आपल्या करियरमध्ये ३०० हून अधिक क्लब गोल केले होते. तर पेले यांनी ७०० हून अधिक क्लब गोल केले होते. ब्राजीलचे पेले यांचा गोल करण्याच रेकॉर्ड अर्जेंटीनासाठी डिएगो माराडोना यांच्यापेक्षा उत्तम आहे.

दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी
ब्राजीलचे फुटबॉलपटू पेले यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करियरच्या दरम्यान आपल्या देशासाठी ७७ गोल केले होते, तर माराडोना यांनी नेटच्या मागे ३४ वेळा हिट केले होते. पेले यांची गोलस्कोरिंग प्रति मॅच ०.८४ होती. पण माराडोना यांनी ०.३७ प्रति मॅच गोल केले होते. पेले यांनी तीन वर्ल्ड कप विजेता संघ (१९५८,१९६२,१९७०) चा हिस्सा होते. तर माराडोना यांनी फक्त एकदाच (१९८६) पुरस्कार जिंकला होता. दरम्यान, माराडोना १९९० मध्ये अंतिम सामान्यात पराभव झाले होते. (Pele Vs Diego Maradona)

फिफा वर्ल्ड कपची अशी होती आकडेवारी
दोन्ही खेळाडू चार वर्ल्ड कप टूर्नामेंटचे हिस्सा बनले. पेले यांनी वर्ल्ड कप मध्ये माराडोना पेक्षा अधिक गोल केले, १४ खेळांमध्ये १२ गोल (१९५८ आणि १९७० च्या फाइनलमधील गोलसह) केले. तर माराडोना यांनी २१ वर्ल्ड कप सामान्यांमध्ये आठ गोल केले, ज्यामध्ये अर्जेंटीनाच्या १९८६ च्या सफल अभियानाचे चार गोलचा समावेश आहे.

हे देखील वाचा- फुटबॉलचा जादूगार- लियोनेल मेस्सी

मला भारतात येणे आवडते-पेले
सौरव गांगुली यांनी नेताजी इंडोर स्टेडियमवर जेव्हा पेले यांचे स्वागत केले होते तेव्हा असे म्हटले होते की, मी तीन वर्ल्ड कप खेळलो आणि विजेता, उपविजेता होणे यामध्ये काही फरक नाही. तीन वर्ल्ड कप आणि गोल्डन बूड जिंकणे फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा पेले यांनी म्हटले होते की, मला भारतात येणे आवडते कारण येथील लोक मला फार आवडतात. त्यांनी असे ही म्हटले होते की, जर मी एखाद्या प्रकारे मदत करु शकतो तर मी जरुर पुन्हा येईन.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.