तुम्हाला सुद्धा ईमेलवर एखादी पीडीएफ फाइल अशी आली असेल ना ज्यासाठी पासवर्ड लावला गेला आहे? तसेच वारंवार फाइल सुरु करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड द्यावा लागतो. यामुळे काहीजण त्रस्त होतात. कारण समोरच्या व्यक्तीकडे काही वेळेस आपल्याला पासवर्ड वारंवार मागावा लागतो. त्यामुळे या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही सोप्प्या ट्रिक आहेत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही पीडीएफ फाइलला लावलेला पासवर्ड काढू शकता. (PDF Password)
गुगल क्रोमच्या माध्यमातून हटवा पासवर्ड
जर तुम्ही गुगल क्रोमच्या मदतीने आपल्या पीडीएफ फाइलचा पासवर्ड काढायचा असेल तर तु्म्हाला पुढील काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
-सर्वात प्रथम गुगल क्रोम मध्ये आपला पासवर्ड असणारी फाइल सुरु करा
-त्यानंतर पीडीएफ फाइलचा पासवर्ड टाकून फाइल सुरु करा
-फाइल सुरु झाल्यानंतर Ctrl+P किंवा File>Print>Save as PDF ची कमांड द्यावी लागेल
-सेव पीडीफ असणाऱ्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेथे पाहिजे तिथे डिवाइसमध्ये फाइल सेव करु शकता. सेव केलेली फाइल तुम्ही सुरु कराल तेव्हा नवी फाइलमधील पासवर्ड गेलेला असेल. अशातच तुम्ही पासवर्ड शिवाय फाइल सुरु होईल
PDF रिडरच्या मदतीने हटवा पासवर्ड
जर तुम्हाला पीडीएफचा पासवर्ड काढायचा असेल तर पीडीएफ रिडरच्या मदतीने पासवर्ड काढू शकता.
-सर्वात प्रथम आपल्या कंप्युटर अथवा लॅपटॉपवर पीडिएफ रिडरमध्ये पीडीएफ फाइल सुरु करा
-त्यानंतर Choose Tools>Encrypt>Remove Security वर जा
-त्यानंतर आपल्या फाइलचा पासवर्ड टाका आणि ओके दाबा
-पीडीएफ फाइल पासवर्ड टाकल्यानंतर सॉफ्टवेअर तुमच्या फाइलचा पासवर्ड काढून टाकतो (PDF Password)
पीडीएफ फ्री मध्ये एडिट करण्याचे टूल
हा एक फ्री पीडीएफ रिडर असून आयओएस आणि अँन्ड्रॉइड या दोन्ही डिवाइसमध्ये वेबसाठी सुद्धा उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला टेक्स्ट, इमेज आणि लिंक एडिट करण्यासह एनोटेशन, सिग्नेचर आणि फॉर्म फील्ड अॅड करण्याची परवानगी मिळते. Xodo टेक्स्टला हाइलाइट करणे, अंडलाइन करणे आणि स्ट्राइक करण्याची परवानगी देतो.
हे देखील वाचा- WhatsApp बनलाय स्पॅमिंगचा अड्डा, ९५ टक्के युजर्सला येतात असे मेसेज
वापरण्याची पद्धत
-गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर मधून Xodo ला डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा
-अॅप सुरु करा आणि ओपन बटणावर क्लिक करा
-त्या पीडीएफ डॉक्युमेंटची निवड करा जी तुम्हाला एडिट करायची आहे
-डॉक्युमेंटला एडिट करण्यासाठी स्क्रिनच्या वरती आणि खाली असलेल्या टूलचा वापर करा
-आपल्या Change ला सेव करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा