जगात ‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘ॲव्हेंजर्स’ अशा विविध हॅालिवूडपटांमधील सुपरहिरोजनी रसिकांना भुरळच घातली आहे. तर हेच हॉलिवूड सुपरहिरो खेळण्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या घरातही पोहचले आहेत. लहान मुलांना त्यांच्या जीवनत ही खेळणी किंवा टॉइझ स्वरूपात त्यांच्या जवळ असतात. यामुळे लहान मुलांना या सुपरहिरोचं प्रचंड कौतुक असतं.
आपल्या महाराष्ट्राला आधुनिक इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. त्या इतिहासात होते खरेखुरे सुपरहिरो! परंतु ते सुपर हिरो कधी लहान मुलांपर्यंत पोहचलेच नाहीत किंवा त्यांचा इतिहासातील पराक्रम त्यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. आपला इतिहासाचा वारसा पुढे चालवायचा असेल, तर त्यांना त्या काळातील खास करून शिवकालीन सुपरहिरोज कोण होते, त्यांनी काय केले होते, त्यांच्या पराक्रम, त्यांची जिद्द या सर्व गोष्टी समजणे गरजेचे आहे.
दिवाळी आली की, लहान मुलांना किल्ले बांधण्याची ओढ लागते. किल्ले बांधून झाले की, मग त्यावर छत्रपती शिवाजी महाराजाची मृर्तीची स्थापना केली जाते. एवढेच नाही, तर मातीचे मावळे देखील किल्ल्यावर पहारेकरी म्हणून उभे केले जातात. एकप्रकारे हा इतिहास अनुभवता येतो.
पूर्वी या मुलांसमवेत मोठेही त्यांच्यात सामील व्हायचे. त्यामुळे किल्ले बनविताना गप्पांच्या माध्यमातून इतिहास काळातील शूरवीराची कहाणी लहान मुलांना समजत होती. परंतु, सध्याच्या धावपळीच्या जगात एवढा वेळ कोणाकडे असतो? दिवाळीच्या निमित्ताने तरी इतिहासातील म्हणजेच शिवकालीन सुपरहिरो हे त्या काळातील मुलांना माहिती होते आणि त्यमुळेच त्या मुलांचे ते आर्दश हिरो होते.
सध्याच्या डिजिटल युगात मुलांना आता फक्त हॉलिवूड हिरोज माहिती आहेत. परंतु त्यांना आपल्या इतिहासातील शूरवीर म्हणजे खऱ्या सुपरहिरोची ओळख व्हावी. यासाठीच प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजवत इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेले खरे सुपरहिरो महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेले आहेत. हे सुपरहिरो खेळणी रूपाने मुलांच्या भावविश्वात आणि त्या अनुषंगाने घरोघरी पोहाचवण्याचे अनोखे आणि अत्यंत प्रेरणादायी काम आलमंड्स क्रिएशन्स तर्फे ‘पावनखिंड’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
हॅालिवूड मधलील सुपरहिरोज काल्पनिक आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले शूरवीर मावळे हे खरे सुपरहिरो आहेत, होते आणि शेवटपर्यंत असणार आहेत. आजच्या काळात हे सर्व शिवकालीन सुपरहिरोज आणि त्यांची माहिती भावी पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
====
हे ही वाचा: छ. शिवाजी महाराजांचा ‘हा’ गड आजही अजिंक्य आहे! मावळ्यांचे वंशज आजही इथे वास्तव्यास आहेत; वाचा गडाचा इतिहास
====
‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने अशा प्रकारचा पहिला प्रयत्न करण्यात आला आहे, जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा अभिमानास्पद आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटात शिवकालीन सुपरहिरोज म्हणजेच प्राणपणाने लढणारे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, रायाजीराव बांदल, श्रीमंत कोयाजीराव बांदल यांच्यासह बांदल सेनेतील काही निवडक शूरवीर मावळे आकर्षक खेळण्यांच्या रूपात लहान मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. लहान मुलांचा खेळही व्हावा आणि त्यांना शिवकालीन इतिहासाची माहिती ही मिळावी असा दुहेरी हेतू यामागे आहे.
पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्याचे काम त्यामुळे सोपे होणार आहे. खेळता-खेळता त्यांच्या मनावर इतिहासाची माहिती कोरली जाईल. मोल्डींगची ही खेळणी अत्याधुनिक प्लॅस्टीक फॅारमॅटमध्ये आहेत. मजबूत, आकर्षक आणि टिकाऊ असलेली ही खेळणी आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील दुकानांसह सर्व मॅाल्समध्ये ही खेळणी पोचणार आहेत. ‘पावनखिंड’ प्रदर्शित होण्यापूर्वी ही बच्चे कंपनींपर्यंत ही खेळणी पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाचे नियम व अटी खेळण्यांसोबतच देण्यात आले आहेत. मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत.
‘पावनखिंड’ चित्रपटाच्या निमित्ताने अजय आणि अनिरुद्ध आरेकर या निर्मात्यांनी केलेला हा अनोखा प्रयत्न प्रादेशिक चित्रपटांमध्ये आणि त्यातही मराठीत प्रथमच होताना दिसत आहे.
====
हे ही वाचा: Rahul Bajaj Passes Away: राहुल बजाज काळाच्या पडद्याआड!
====
संपूर्ण महाराष्ट्र ‘पावनखिंड’ चित्रपटाची वाट बघत आहेत. तो चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांची असून दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे लेखन–दिग्दर्शन केले आहे