Home » Pateti : पारसी नववर्ष: पतेती सणाचा इतिहास आणि महत्व

Pateti : पारसी नववर्ष: पतेती सणाचा इतिहास आणि महत्व

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pateti | Latest Marathi News
Share

‘विविधतेमध्ये एकता’ हा संदेश देणारा भारत हा एकमेव देश आहे. या देशामध्ये नानाविध धर्माचे असंख्य लोकं गुण्यागोविंदाने राहतात. हिंदूंचा देश अशी ओळख असणाऱ्या भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, इसाई, पारशी आदी अनेक धर्मांचे लोकं राहतात. त्यामुळेच भारतात प्रत्येक धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ‘सर्व धर्म समभाव’ हे ब्रीदवाक्य पाळणाऱ्या भारतात पारशी लोकांचा देखील प्रकर्षाने सहभाग आपल्याला दिसतो. भारत देशातील एक मुख्य धर्म म्हणून पारशी धर्माची ओळख आहे. याच धर्माचा अतिशय महत्वाचा आणि मोठा सण आहे, पतेती. (Marathi)

पारशी नववर्षाचा सण हा नवरोज म्हणून ओळखला जातो. पर्शियनमध्ये नव आणि रोझ या शब्दांचा अर्थ नवीन आणि दिवस असा होतो. नवरोजला जमशीदी नवरोज, नौरोज, पतेती या नावाने ओळखले जाते. इंग्रजी कॅलेडरनुसार १ जानेवारीला नववर्ष, हिंदू धर्मात चैत्र महिन्यात नवीन वर्ष तर पारशी कॅलेडरनुसार नवरोजच्या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जाते. पारशी लोकांचे नवीन वर्ष या सणानंतर सुरु होते. यंदा पतेतीचा सण १४ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर १५ ऑगस्ट दिवशी पारशी समाज नववर्ष साजरे करणार आहे. (Marathi News)

पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी नूतन वर्षाचा आरंभ ‘फरवर्दीन’ माहिन्याने होतो. पारशी समाजाच्या पारंपरिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी लोक अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा, चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी ते अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा असतो. (Todays Marathi Headline)

Pateti

झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार ३००० वर्षांपूर्वी या दिवशी साह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता. पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. (Top Trending Headline)

हिंदू धर्माप्रमाणेच पारसी धर्माचे लोकही अग्नीची पूजा करतात. हे लोक अग्नीला पवित्र मानतात आणि त्यात यज्ञही करतात. पारशी लोकं या दिवशी नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या पूजास्थळावर म्हणजेच अग्नि देवतेच्या मंदिरात जातात आणि प्रार्थना करतात. यानंतर लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. तसेच एकमेकांना घरी जेवणासाठी आमंत्रित करतात. या उत्सवाची तयारी महिनाभरापूर्वी सुरू केली जाते. या दिवशी लोक आपली घरे साफ करतात. फुलांनी आणि रंगांनी घरांची सजावट करतात. तसेच या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करतात. (Top Marathi News)

अनेक भागात पतेती हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. मार्च आणि ऑगस्ट महिन्यात अर्धवार्षिक आणि वार्षिक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील पारशी लोक हा सण पारशी दिनदर्शिकेच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २१ मार्च रोजी साजरा करतात. तर भारतातील पारशी लोक शहाशाही कॅलेंडरचे पालन करतात. म्हणूनच ते १४ ऑगस्ट रोजी साजरा करतील. (Latest Marathi News)

===================

हे देखील वाचा : Shravan : श्रावण विशेष : त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास

Janmashtami : २०० वर्ष जुने ऐतिहासिक नाशिकमधील मुरलीधर मंदिर

===================

नवरोज हा सण पर्शियाचा राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. राजा जमशेद यांनी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारशी नववर्षाचा उत्सव जमशेद-ए-नौरोज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी विविध पदार्थ बनवून एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. (Top Stories)

इंग्रजी दिनदर्शिकेनुसार वर्षात ३६५ दिवस असतात, पण पारशी समाजातील लोक फक्त ३६० दिवसच वर्ष मानतात. वर्षातील शेवटचे पाच दिवस गाथा म्हणून साजरे केले जातात. म्हणजेच या पाच दिवसांत कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात. नवरोजचा इतिहास मान्यतेनुसार, झोरास्ट्रियन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक राजा जमशेदच्या स्मरणार्थ नवरोजचा सण साजरा करतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.