Passport Status : पासपोर्ट भारतातील नागरिकत्वापैकी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. पासपोर्टचा वापर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी देखील वापरू शकता. याशिवाय पासपोर्टच्या माध्यमातून तुम्ही देशाबाहेर प्रवास करू शकता. खरंतर पोलीस वेरिफिकेशन पासपोर्टवेळी करावेच लागते. पोलिसांच्या वेरिफिकेशननंतरही तुम्हाला पासपोर्ट आला नाही तर काय कराल? याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
पासपोर्टचे वेरिफिकेशन पूर्ण होते तेव्हा लोक अर्ज कुठवर पोहोचला आहे याबद्दल ऑनलाइन पाहतात. खरंतर पोलीस वेरिफिकेशन झाल्याच्या काही दिवसानंतर तुम्हाला पासपोर्ट जारी केला जातो. मात्र काही वेळेस स्थिती वेगळी निर्माण होऊन तुमचा पासपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचला जाऊ शकत नाही. पासपोर्ट स्टेटस पाहूनही काही होत नाही. अशातच पुढील काम नक्की करू शकता.
पोलिसांच्या वेरिफिकेशननंतरही पासपोर्ट न आल्यास अधिक वेळ दवडू नका. यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र किंवा रिजनल पासपोर्ट ऑफिसशी संपर्क साधा. येथून तुम्हाला पासपोर्ट अर्जाबद्दल सांगितले जाऊ शकते. पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आलाय किंवा कोणती समस्या येतेय याबद्दल सांगितले जाईल.
अपॉइंटमेंट करा बुक
पासपोर्ट सेवा केंद्र किंवा रिजनल पासपोर्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. कागदपत्रांसाठी जसे वेरिफिकेशन केले होते त्याचप्रमाणे आताही तशीच प्रोसेस फॉलो करावी लागेल. तुम्ही सर्व कागदपत्र पासपोर्ट सेवा केंद्र किंवा RPO मध्ये तपासून पाहू शकता. याला Enquiry Appointment असे म्हटले जाते.
इन्क्वायरी अपॉइंटमेंटसाठी पासपोर्ट सेवेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही Check Appointment Availability ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला PSK/RPO मध्ये अपॉइंटबद्दल दाखवले जाईल. यावरुन तुम्हाला कोणत्या तारखेला अपॉइंट मिळेल याबद्दल दिसेल. केवळ लक्षात ठेवा. तुम्हाला इन्क्वाअरी अपॉइंटमेंट बुक करायची आहे. (Passport Status)
पासपोर्ट सेवा पोर्टलवर आयडी आणि पासवर्डसोबत लॉगइन केल्यानंतर अपॉइंटमेंट बुक होईल. पासपोर्ट कार्यालयात जाऊन तुम्ही आपल्या अर्जाबद्दल सांगू शकता. पोलीस वेरिफिकेशननंतर तुमचा पासपोर्ट का अडकला गेलाय हे देखील विचारू शकता. पासपोर्ट कर्मचारी तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देतील. याशिवाय पुढे काय करावे हे देखील सांगितील. सर्वकाही ठिक असल्यास तुम्हाला पासपोर्ट लवकरात लवकर मिळेल.