Home » Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य

Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
Passport
Share

पासपोर्ट काढणे किंवा पासपोर्ट असणे आजच्या काळात अजिबातच मोठी बाब राहिलेली नाही. केवळ परदेशी प्रवास करण्यासाठीच नाही तर आपली ओळख असण्याचा महत्वाचा आणि मोठा पुरावा असल्याने आजकाल अनेक लोकं पासपोर्ट काढण्यासाठी प्राधान्य देतात. पासपोर्ट हा प्रत्येक देशातील नागरिकांचा परदेश प्रवास करण्याचा, नागरिकत्व सिद्ध करण्याचा आणि स्वतःची ओळख दाखवण्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांसाठी पासपोर्ट सेवा देत असतो. (Passport)

याच पासपोर्टमुळे परदेशात आपल्याला प्रवेश मिळतो. परदेशात प्रवास करताना आमपासून खासपर्यंत सर्वच लोकांकडे पासपोर्ट असणे आवश्यक असते. हा पासपोर्ट अगदी एक दिवसाच्या बाळापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत कोणीही काढू शकतो. फक्त अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक असते. आता ज्यांच्याकडे पासपोर्ट असेल त्यांना किंवा अनेकांना माहित असेल की, आपल्याला सरकारडून मिळणार पासपोर्ट हा निळ्या रंगाचा असतो. मात्र तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल की भारत सरकारकडून केवळ निळ्या नाही तर लाल, नारंगी आणि पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट देखील दिला जातो.(Passport Colour Code)

Passport

मग आपल्याला निळ्या रंगाचा पासपोर्ट का दिला जातो? आणि इतर रंगाचे पासपोर्ट कोणाला दिले जातात? पासपोर्टचे असलेले वेगवेगळे रंग नक्की काय सांगतात? यामागील उद्देश काय? हे सर्व आपण या लेखातून जाणून घेऊया. पासपोर्टचा रंग फक्त सजावटीसाठी दिलेला नसतो. तर याच रंगावरून पासपोर्ट धारकाची ओळख, भूमिका आणि त्याचे पद स्पष्ट होते. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर, पासपोर्टच्या रंगावरुन त्या व्यक्तीला विशेष सुविधा आणि सुरक्षा प्रदान केली जाते.(Top Marathi Stories)

==============

हे देखील वाचा : Mohammed Bin Salman : सौदीच्या राजकुमाराच्या विधानानं खळबळ !

===============

निळा पासपोर्ट (Blue Colour Passport)
निळ्या रंगाचा पासपोर्ट हा आपल्या देशातील सर्वसामान्यांसाठी तयार करण्यात आला आहे. हा पासोर्ट देशातील सामान्य नागरिकांना दिला जातो. या पासपोर्टमध्ये त्या व्यक्तीच्या नावासोबतच त्या व्यक्तीची जन्मतारीख, रहिवाशी पत्ता, ओळखीसाठी फोटो, सही, शरीरावरील महत्वाची खूण याची माहितीही देण्यात आलेली असते. या पासपोर्टवर एखाद्या देशाचा व्हिसा मिळाल्यानंतर त्या देशात सहज प्रवास करता येतो.

Passport

पांढरा पासपोर्ट (White Colour Passport)
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट हा सरकारी कामानिमित्त परदेशात प्रवास करणाऱ्या लोकांना दिला जातो. सरकारी कामानिमित्त परदेशात जाणारे लोक याच पासपोर्टचा वापर करतात. सरकारी अधिकारी म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफिशियल्सना हा पासपोर्ट मिळतो. त्याच्या रंगावरुनच त्याचं वेगळेपण सहज लक्षात येतं. कस्टम चेकिंगच्या वेळेसही त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते. शिवाय हा पासपोर्ट असल्यास अनेक सुविधा मिळतात.

Passport

मरुन पासपोर्ट (Maroon Colour Passport)
या पासपोर्टचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असंही म्हटलं जातं. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी एक वेगळा अर्ज करावा लागतो. विदेशात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हा पासपोर्ट दिला जातो. त्यांची परदेशात विशेष ओळख असावी यासाठीच सर्वसामान्य पासपोर्ट पेक्षा त्यांना वेगळ्या रंगाचा पासपोर्ट प्रदान केला जातो. या पासपोर्टधारकांवर परदेशात एखादा खटला चालवणं खूपच कठीण आणि दुर्मिळ असतं. या पासपोर्टधारकांना कोणत्याही प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता नसते. या रंगाचा पासपोर्ट असणाऱ्या लोकांना प्रवासाच्या ठिकाणापर्यंत सर्व सेवा या मोफत मिळतात.(Social News)

Passport

==============

हे देखील वाचा : Space : ‘या’ प्राण्यांच्या मदतीने माणसाने विज्ञानात आणखी प्रगती केली

===============

नारंगी पासपोर्ट (Orange Colour Passport)
केंद्र सरकारने २०१८ सालापासून नारंगी रंगाचा पासपोर्ट सुरू केला. ज्या लोकांचे शिक्षण हे १० वी पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हा पासपोर्ट तयार करण्यात आला आहे. परदेशात अशिक्षित नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याला इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड श्रेणी असं नाव देण्यात आले आहे. हा पासपोर्ट जास्त करुन विदेशात मायग्रंट कामगारांसाठी असतो. त्यांना माहिती मिळवण्यासाठी कुणाच्या तरी मदतीची गरज असते.(Marathi Latest News)

Passport


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.