Home » ऋतिक रोशनची धाकटी बहीण पश्मीना लवकरच मोठ्या पडद्यावर

ऋतिक रोशनची धाकटी बहीण पश्मीना लवकरच मोठ्या पडद्यावर

by Team Gajawaja
0 comment
Pashmina Roshan
Share

बॉलिवूडमध्ये कपूर, बच्चन, खान कुटुंबासारखीच रोशन कुटुंबाचीही खास जागा आहे. राकेश रोशन यांनी बॉलिवूडला दर्जेदार चित्रपट दिले आणि त्यांचे भाऊ राजेश रोशन यांनी संगीताच्या माध्यमातून सुमधूर गाणी दिली. राकेश रोशन यांचा मुलगा ऋतिक रोशननं पदार्पणातच सुपरहिरो म्हणून ओळख मिळवली. आता याच रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. आणि ती आहे पश्मीना रोशन (Pashmina Roshan) संगीतकार राजेश रोशन यांची लेक आणि ऋतिक रोशनची धाकटी चुलत बहीण लवकरच बॉलिवूडमध्ये दाखल होतेय.  

शाहिद कपूरचा 2003 मध्ये आलेला चित्रपट ‘इश्क विश्क’ याचा सिक्वल येतोय, त्यामध्येच प्रमुख भुमिकेत ‘पश्मीना रोशन’ डेब्यु करीत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यावर पश्मीना एकदम प्रकाशझोतात आली.  पश्मीनाचा मोठा भाऊ म्हणजेच ऋतिक रोशन याला ‘ग्रीक गॉड’ म्हणून संबोधले जाते. (Pashmina Roshan is Ready to make her Bollywood debut)

आपल्या भावासारखीच पश्मीनाही देखणी आहे. सोशल मिडीयावर तिचे लाखो फॅन आहेत. असे असले तरी ज्येष्ठ संगीतकार राजेश रोशन यांची ही लेक आत्तापर्यंत बॉलिवूडपासून अंतर ठेऊन होती. एका कौंटुबिक समारंभात नेमकं तू काय करणार, हा प्रश्न पश्मीनाला विचारण्यात आला. तेव्हा पश्मीनानं वडील आणि ऋतिकच्या सल्ल्यानुसार अभिनयात करिअर करण्याचं नक्की केलं. 

यानंतर पश्मीनानं नादिरा बब्बर यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तसेच बैरी जॉन इंस्टीट्यूट मध्येही आवश्यक प्रशिक्षण घेतले. या सर्वात तिचा मार्गदर्शक म्हणून मोठा भाऊ ऋतिक रोशन यांने काम पाहिलं आहे. आता पश्मीना, मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार, म्हणून ऋतिकनं तिला खास शुभेच्छाही दिल्या आहेत. (Bollywood debut of Pashmina Roshan)

पश्मीनाला ऋतिक पाश, म्हणून संबोधतो. या आपल्या लाडक्या बहिणीला शुभेच्छा देताना त्यानं, “पाश, तुला जे हवं होतं ते तू मिळवलं आहेस. मला तुझा अभिमान वाटतो…माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत कायम असतील. इश्क विश्क रिबाऊंडची सर्वच टीम उत्तम आहे. तुम्हा सर्वांनाच भरपूर शुभेच्छा.” असा संदेश देऊन ऋतिकने आपल्या छोट्या बहिणीचा उत्साह वाढवला आहे.  

इश्क विश्क रिबाऊंडमध्ये पश्मीनासोबत रोहित सराफ, जिब्रान खान आणि नैला ग्रेवाल हे कलाकारही आहेत. 19 वर्षानंतर इश्क विश्कचा सिक्वल येत आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी या चित्रपाटचे दिग्दर्शक असून रमेश तौराणी निर्माते आहेत.   

अत्यंत सुंदर असणा-या पश्मीनाच्या बॉलिवूड एन्ट्रीनं स्टार कीडमध्ये स्पर्धा अधिक वाढणार आहे. सारा, जान्हवी, अनन्या या सर्वांपेक्षाही पश्मीना देखणी आहे, मात्र अभिनयात पश्मीनाची जादू कशी आहे, यावरच तिचे बॉलिवूडमधील स्थान नक्की होणार आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.