Home » Jain : जैन समाजात साजरे केले जाणारे पर्युषण पर्व म्हणजे काय?

Jain : जैन समाजात साजरे केले जाणारे पर्युषण पर्व म्हणजे काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jain
Share

भारत हा ‘सर्वधर्म समभाव’ या तत्वावर चालणारा देश आहे. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. आता जेवढे वेगळे धर्म तेवढेच या सर्व धर्मांचे विविध सण आणि महत्वाचे दिवस देशामध्ये साजरे केले जातात. त्यामुळे आपल्या देशात वर्षभर सणवार, शुभपर्व साजरे केले जातात. भारतातील मुख्य धर्मांपैकी एक धर्म म्हणजे जैन धर्म. भारतात बऱ्यापैकी जैन धर्माचे लोकं राहतात. त्यामुळे जैन धर्माचे विविध सणवार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. याच जैन धर्माचा अतिशय पवित्र समजला जाणारा काळ म्हणजे ‘पर्युषण पर्व’. नुकतीच जैन लोकांच्या या पर्युषण काळाची सुरुवात झाली आहे. संपूर्ण वर्षभरातील हा पर्युषणाचा काळ जैन लोकांसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र समजला जातो. जैन धर्मात आठ दिवसीय पर्युषण पर्व साजरे केले जाते. जैन धर्मात दोन संप्रदाय मानणारे लोक आहेत. (Jain)

श्र्वेतांबर संप्रदायात २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्टपर्यंत पर्युषण पर्व असेल, तर दिगंबर संप्रदायात २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत पर्युषण पर्व साजरा केला जाईल. आपण अनेकदा ऐकतो की पर्युषण काळ आहे, या काळात जैन लोकं अनेक रीती पाळताना दिसतात. त्यांच्या खाण्याच्या पद्धतीने देखील या काळात बदलतात. मग नक्की या काळात जैन लोकं काय करतात? पर्युषण पर्व म्हणजे काय? याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. (Marathi Top News)

पर्युषण पर्व म्हणजे?
श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व हा ८ दिवसांचा असतो. तर दिगंबर जैन बांधवांचा सण हा १० दिवसांचा असतो. श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व संपल्यावर दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व सुरु होते. जैन बांधव या पर्युषण पर्व काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडत असल्याची मान्यता आहे. (Marathi News)

==========

Ganesh Chaturthi : श्री अथर्वशीर्षाची माहिती आणि महत्व

==========

Jain

मनात येणारे तामसिक विचार दूर करण्याचा उपवास म्हणजेच पर्युषण असे म्हणतात. पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, या उत्सवात आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचारांपासून सुटका. जैन बांधवांचा पर्युषण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या १० नियमांचे पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात. हा उत्सव जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. (Top Trending News)

या उत्सवाच्या काळात जैन धर्मिय बांधव संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. पावसाळ्यात साजरा होणारं हे पर्युषण पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचं प्रशिक्षण देतो. या उत्सवात जैन समाजातील बांधव संपूर्ण भक्तीभावाने धार्मिक उपवास करतात. “मिच्छा् मी दुक्कडं” ही प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते. त्याचा अर्थ म्हणजे, वर्षभर आपल्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी पर्युषण पर्वाच्या अंतिम दिवशी म्हणजे, संवत्सरीला मागितली जाते. त्यालाच “मिच्छा् मी दुक्कडं” असे म्हणतात. (Top Marathi Headline)

या पर्वादरम्यान लोक आपल्या पापांपासून दूर जाण्यासाठी आणि यापासून मुक्ती मिळविण्यासाठी ध्यान, उपवास, धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि आपल्या पापांसाठी क्षमा मागतात. या कालावधीत महावीर स्वामींनी दिलेल्या शिकवणीचं पालन करतात. श्र्वेतांबर समाज आठ दिवसांपर्यंत पर्युषण पर्व साजरा करतात, ज्याला अष्टान्हिका म्हटले जाते. तर दिगंबर दहा दिवसांपर्यंत पर्युषण पर्व साजरा करतात, त्याला ते दसलक्षण म्हणतात. (Latest Marathi News)

आषाढ शुक्ल चतुर्दशीला जैन धर्मातील चातुर्मास सुरू होतो. या चार महिन्यांत जैन बांधव तप-साधना करतात. या कालावधी दरम्यानच भाद्रपद महिन्यात संवत्सरी पर्व साजरे केले जाते. जैन धर्मामध्ये मुख्य दोन पंथ येतात, श्वेतांबर आणि दिगंबर पण या दोन्ही पंथामध्ये संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. पर्युषण पर्वाच्या काळात जैन बांधव, सर्व कंद-मूळ, पालेभाजी यासह अनेक गोष्टीचा त्याग करतात. चोहीयार म्हणजेच सायंकाळ होण्या अगोदर भोजन घेतात. या बरोबरच अनेक जैन बांधव पाणी देखील न घेता कडक उपवास करतात.जैन मंदिर, जैन स्थानक यामध्ये गुरु महाराज यांचे प्रवचन , धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. (Todays Marathi Headline)

Jain

दसलक्षण काय आहे?
उत्तम क्षमा धर्म, उत्तम मार्दव धर्म, उत्तम आजर्व धर्म, उत्तम शौच धर्म, उत्तम सत्य धर्म, उत्तम संयम धर्म, उत्तम तप धर्म, उत्तम त्याग धर्म उत्तम आकिंचन धर्म, उत्तम ब्रहचर्य धर्म हे विविध प्रकारचे धर्म असतात. (सर्वोत्तम धर्म म्हणजे क्षमा, सर्वोत्तम धर्म म्हणजे दया, सर्वोत्तम धर्म म्हणजे अज्रव, सर्वोत्तम धर्म म्हणजे स्वच्छता, सर्वोत्तम धर्म म्हणजे सत्य, सर्वोत्तम धर्म म्हणजे आत्मसंयम, सर्वोत्तम धर्म म्हणजे तप, सर्वोत्तम धर्म म्हणजे त्याग, सर्वोत्तम धर्म म्हणजे दारिद्र्य आणि सर्वोत्तम धर्म म्हणजे ब्रह्मचर्य.) (Top Trending News)

जैन समाजासाठी हा काळ आपल्या आयुष्याबाबत चिंतन करण्याचा आणि ज्या लोकांसोबत ते चुकीचं वागले त्यांची क्षमा मागण्याचा काळ असतो. अशी मान्यता आहे, या पर्वाची सुरुवात सहाव्या शतकात ईसा पूर्व काळात झाली होती. त्यावेळी जैन गुरू महावीर यांनी आपल्या अनुयायांनी हिंसापासून दूर राहणे आणि अध्यात्मिक शुद्धतेवर लक्ष केंद्रीत करण्याची शिकवण दिली होती. या पर्वात वाईट कामांचा नाश करीत सत्य आणि अहिंसाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देते. (Top Stories)

पर्युषण पर्वाच्या काळात करता ही प्रमुख कामे :
– पर्युषण पर्वाच्या काळात सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचं वाचन करतात.
– धार्मिक प्रवचन ऐकले जातात.
– पर्युषण पर्वाच्या काळात भाविक उपवासही करतात. पुण्य लाभावे यासाठी दान देणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
– जैन मंदिरांची विशेषत: साफ सफाई करुन स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते.
– पर्युषण पर्वाच्या काळात रथयात्रा किंवा मिरणवणुका काढल्या जातात.
– या काळात मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक भोजनाची व्यवस्था केली जाते.

========

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

Ganesh Chaturthi : गणपतीची मूर्ती घरी आणताना ‘या’ गोष्टी ठे

========

या व्रताच्या अखेरच्या दिवसाला संवत्सरी असे म्हणतात. क्षमा हे वीरांचे भूषण आहे, असे भगवान महावीर यांनी आपल्या उपदेशात सांगितले आहे. त्याला अनुसरून या पर्वाच्या सांगतेत उपासकाने सर्वांची क्षमा मागणे, याला या व्रतात विशेष महात्त्व दिले गेले आहे. क्षमा ही सर्व पापांना दूर करून मोक्षाचा मार्ग दाखविते असा विचार यामागे आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.