Home » पावसाळ्यात आरोग्यदायी पारिजातकाच्या पानांचा रस

पावसाळ्यात आरोग्यदायी पारिजातकाच्या पानांचा रस

by Team Gajawaja
0 comment
Healthy Juices
Share

जून महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात पावसानं आपला जोर वाढवला आहे. पावसाळा आल्यावर आल्हाददायक वातावरण होतं, तसंच आताच वातावरण आहे. पण या पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप हे तीनही आजार हातात हात घालून येतात. बहुधा प्रत्येक घरात या तीन आजारांचा फेरा बसतो. जिथे लहान मुलं असतील त्या घरात तर सर्दी आणि खोकला यांचे रुग्ण सापडतातच. अशात काही घरगुती आणि सोपे उपाय जर केले तर या पावसाळी सर्दीवर मात करता येते. आयुर्वेदामध्ये असे अनेक छोटे छोटे उपाय सांगितले आहेत की, ज्यांच्यामुळे पावसाळ्यातील हे तीनही आजार कधी त्रस्त करीत नाहीत. यामध्ये पारिजातकांच्या पानांचे खूप महत्त्व आहे. पारिजातकाची पांढरी सुंगधी फुले ही देवाला अर्पण केली जातात. याच पारिजातकाची पाने ही पावसाळी आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापरली जातात.  या पानांना गरम पाण्यात उकळून त्याचा काढा घेतल्यास सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना रोखता येते. शिवाय शरीराच्या अन्य तक्रारीही दूर करता येतात. (Healthy Juices)  

पारिजातकाची फुले आणि त्याची पानंही औषधात वापरली जातात. ही औधषी वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. बदलत्या हवामानामुळे होणारे रोग या पारिजातकाच्या पानांच्या मदतीने रोखता येतात. पावसात भिजल्यावर सतत शिंका येत असतील आणि सर्दी झाली असेल तर या पारिजातकाच्या पानांचा काढा त्यावर उपयोगी पडतो. साधारण दहा स्वच्छ धुतलेली पारिजातकाची पाने आणि त्यासोबत तुळशीची पाने, आल्याचा तुकडे, दालचिनी आणि काळीमिरी असे मिश्रण उकळून घेतले तर त्याचा खूप फायदा होतो. हा काढा आयुर्वेदीक चहा म्हणूनही ओळखला जातो. यात चवीसाठी काहीजण मध किंवा गुळाचा वापर करतात. ज्या भागात सतत पाऊस पडतो, तिथे हा पारिजातकांच्या पानांचा चहा हमखास सायंकाळी घेतला जातो. त्यामुळे पावसामुळे होणारे आजार दूर होतात. (Healthy Juices) 

पावसाच्या दिवसात आणखी एक आजार बळावतो, तो म्हणजे, संधीवात. वातावरणात गारवा वाढल्यावर संधीवाताच्या रुग्णांना त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो. अशांसाठी पारिजातकाची पाने उपयोगी पडतात. ही पारिजातकाची पाने खोबरेल तेलात उकळून घ्यावी, हे तेल  संधावाताच्या वेदना जिथे होतात, त्या भागाला लावल्यास वेदनांपासून आराम पडतो. आजकाल कमी वयातच संधीवाताचा त्रास अनेकांना जाणवतो. अशांना नियमीत पारिजातकाच्या पानांच्या पासून तयार केलेले तेल लावले तर नक्कीच फरक पडतो. तसेच पारिजातकाची पाने टाकून उकळलेले पाणी पिण्यानंही संधिवाताच्या रुग्णांना आराम पडतो.  (Healthy Juices)

पारिजातकाची पाने ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.  याशिवाय महत्त्वाचे म्हणजे ज्यांना कायम केसांबाबत तक्रार आहे, त्यांच्यासाठी ही पाने वरदान ठरतात.  कमकुवत केस, केस पांढरे होणे, केस गळणे, केसात कोंडा होणे यासारख्या समस्यांमध्ये पारिजातकाची पाने फायदेशीर ठरतात.  या पानांचा वापर करुन तयार केलेले तेल नियमीत केसांना लावल्यास केस काळे, दाट आणि चमकदार होतात.(Healthy Juices)

========

हे देखील वाचा : बराक ओबामा मोदींवर का रुसले याच कारण आलं समोर

========

पारिजात फुले, पाने आणि साल यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यातून, संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होऊ शकतो.  शरीरातील सूज येण्याची समस्या कमी करण्यासाठी पारिजातच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्या पानांपासून बनवलेल्या लेपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज यापासून आराम मिळतो. पारिजात वनस्पतींमध्ये असलेले गुणधर्म जखमा लवकर भरून काढण्यासाठी प्रभावी ठरतात. चेह-यावर आलेले पिंपल्स किंवा फोडांच्या समस्येमध्ये पारिजात बियांची पेस्ट उपयोगी पडते.  ही पेस्ट चेह-यावर साधारण दहा मिनिटे लावली आणि नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ केला तरी काही दिवसातच चेह-यावरचे डाग कमी होत असल्याचे लक्षात येईल.  सायटिका आजारामध्येही पारिजातकाची पाने फायदेशीर पडतात.  पारिजातकाची सुमारे 8 ते 10 पाने पाण्यात उकळवण्यात येतात.  हे पाणी रिकाम्या पोटी घेतलं तर सायटिकाच्या दुखण्यात आराम पडतो.  पारिजातकाची पाने मूळव्याध किंवा पाईल्स साठी एक चांगले औषध मानली जातात. हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतो.  याचा 15 ते 20 फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारात आराम पडतो, असे सांगितले जाते.  पारिजातकाची झाडे ही पहिल्यांदा प्रत्येक घराच्या अंगणात असायची.  आता ही झाडे कमी झाली आहेत.  पण कुठे हे पारिजातकाचे झाड आढळल्यास त्याच्या पानांचा वापर नक्की करा त्याचा फायदा होतो.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.