Home » Hera Pheri 3: अखेर ‘हेरा फेरी 3’मध्ये बाबू भैय्यांची वापसी

Hera Pheri 3: अखेर ‘हेरा फेरी 3’मध्ये बाबू भैय्यांची वापसी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hera Pheri 3
Share

बॉलिवूडमध्ये येत्या काळात अनेक नवनवीन आणि धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक चित्रपटांच्या गर्दीमध्ये प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती हेरा फेरी सिनेमाच्या तिच्या भागाची. जेव्हापासून या सिनेमाची घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र हा सिनेमा सतत कोणत्या ना कोणत्या वादामध्ये अडकत होता. हेरा फेरी सिनेमाची मुख्य यूएसपी आहे ती, सिनेमातील तीन मुख्य कलाकारांची तिकडी. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे तिघं या सिनेमाची जान आहेत. या तिघांपैकी कोणी एकही या सिनेमात नसेल तरी या सिनेमाची मजाच निघून जाईल. (Hera Pheri 3)

जेव्हा हेरा फेरी या सिनेमाची घोषणा झाली तेव्हा सर्वच कमालीचे खुश झाले, मात्र पुढच्या काही दिवसातच अचानक बातम्या आल्या की, परेश रावल यांनी हेरा फेरी हा सिनेमा सोडला. या बातमीमुळे सिनेमाच्या चाहत्यांची निराशा झाली. आधी वाटले की, या चुकीच्या बातम्या आहेत, मग नंतर बातमी आली की, परेश रावल यांनी हा सिनेमा सोडला आणि त्यांना मिळालेली फी व्याजासकट परत केली. या बातम्यानंतर अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची देखील बातमी समोर आली होती. (Todays Marathi Headline)

परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर अक्षय कुमारची कंपनी असलेल्या केप गुड फिल्मसने परेश रावल यांना लीगल नोटिस पाठवत २५ कोटी मागितले होते. परेश रावल यांना सायनिंग अमाऊंट म्हणून ११ लाख रुपये मिळाले होते. ते पैसे त्यांनी १५ टक्के व्याजासकट परत दिले. या प्रकरणाला घेऊन चांगलाच वाद पेटला होता. आता सिनेमात सगळ्यांचा लाडका ‘बाबू भैया’ नाही म्हटल्यावर प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली. (Marathi Latest News)

Hera Pheri 3

मात्र आता परेश रावल यांनी पुन्हा सिनेमामध्ये वापसी केली आहे. खुद्द परेश यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. परेश रावल यांनी जो काही वाद होता तो संपला आहे आणि ते आता सिनेमात कमबॅक करणार आहेत असे सांगितले आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांना विचारण्यात आले होते की नेमकी कॉन्ट्रॉवर्सी काय होती? त्यावर उत्तर देत परेश रावल म्हणाले, ”कॉन्ट्रोव्हर्सी अशी काही नाही. जेव्हा एखादा प्रोजेक्ट प्रेक्षकांना इतका आवडतो, तेव्हा तो अधिक काळजीपूर्वक हाताळावा लागतो.” (Top Marathi News)

पुढे बोलताना परेश रावल म्हणाले की, “प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे. या प्रेमासोबतच जबाबदारीही देखील येते. आपण ती कधीही हलक्यात घ्यायला नको. मी उत्तमात उत्तम काम करण्याचे तत्व पाळतो. मला फक्त असं वाटते की, सर्वांनी एकत्र येऊन आपले सर्वोत्तम प्रयत्न द्यावे. हीच एक चिंता होती. पण आता सर्वकाही ठीक आहे. सर्वकाही ठीक होणार होते. आम्हाला फक्त काही फाइन-ट्युनिंगची आवश्यकता होती. शेवटी, प्रियदर्शन, अक्षय आणि सुनील हे सर्वजण क्रिएटिव्ह आहेत आणि बऱ्याच काळापासून माझे मित्रही आहेत.” (Top Stories)

‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतण्याचा निर्णय अभिनेते परेश रावल यांनी घेतला आहे. मात्र अचानक काय झाले की परेश यांनी त्यांचा निर्णय बदलला? याबद्दल एका मुलाखतीत चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले. ते म्हणाले, “साजिद नाडियाडवाला आणि अहमद खान यांनी या समस्येवर उपाय काढण्यात मोठी भूमिका बजावली. साजिद नाडियाडवाला यांच्या प्रेमाने, आदराने आणि चांगल्या मार्गदर्शनाने आणि अहमद खान साहेबांच्या पाठिंब्याने ‘हेरा फेरी’ कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे. साजिदने हे प्रकरण सोडवण्यासाठी त्याचा अमूल्य वैयक्तिक वेळ आणि मेहनत दिली. आमचे अनेक वर्षांचे नाते आहे. अहमदनेही खूप मेहनत घेतली. साजिद आणि अहमद यांच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने आता सर्व काही चांगले आणि सकारात्मक आहे.” (Top Trending News)

=========

हे ही वाचा : 

पेले : फुटबॉलचा बादशाह

Tara Bhawalkar : मराठी लोकसाहित्य आणि स्त्रीवादी साहित्य क्षेत्रातील संशोधक- डॉ. तारा भवाळकर

==========

फिरोज यांनी अक्षय कुमारने देखील हा प्रॉब्लेम सोडवण्यात कशी मदत केली हे देखील सांगितले. ते म्हणाले, “आम्हाला अक्षय कडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. १९९६ पासून आमचे खूप चांगले संबंध आहेत. संपूर्ण समस्येला सोडवण्यात अक्षयने देखील खूप मदत केली. प्रियदर्शन, परेशजी आणि सुनील यांनी देखील आम्हाला सहकार्य केले. आता आम्हाला एक चांगला, आनंदी चित्रपट बनवण्याची आशा आहे.” (Social NEws)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.