Home » मुलांचे अभ्यासात मनं लागत नसल्यास वापरा या टिप्स

मुलांचे अभ्यासात मनं लागत नसल्यास वापरा या टिप्स

by Team Gajawaja
0 comment
Parenting Tips
Share

Parenting Tips : प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता दुसऱ्या मुलाच्या तुलनेत फार वेगळी असते. काही मुलं अभ्यासात हुशार असतात तर काहींना अभ्यास करणे अजिबात आवडत नाही. अशातच मुलाचे अभ्यासात मनं लागत नसल्यास काय करावे असा प्रश्न बहुतांश पालकांना पडतो. खरंतर, अभ्यासात मनं न लागण्यामागे मानसिक, भावनिक आणि व्यावहारिक कारण असू शकते. यामुळे जागृक पालक म्हणून मुलाचे अभ्यासात मनं का लागत नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जेणेकरुन मुलाला यासाठी मदत होईल,

लक्ष केंद्रित करता न येणे
मुलांचे लक्ष लगेच दुसऱ्या गोष्टींकडे वळले जाते. खासकरुन आजूबाजूला असणारा टीव्ही, मोबाइल आणि लक्ष भटकवणाऱ्या गोष्टी. याशिवाय झोप पूर्ण न झाल्यानेही मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो. अशातच अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नाही.

भावनात्मक समस्या
मुलं जर अधिक वाईट परिस्थितीतून जात असेल, एखादे दु:ख किंवा कोणत्याही कारणास्तव त्याचे मनं लागत नसेल तर पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. यावेळी मुलावर अभ्यासासाठी जबरदस्ती करू नये. त्याला समजून घेऊन काही गोष्टी सांगाव्यात.

Parenting Tips

Parenting Tips

सकारात्मक वातावरण
प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची एक पद्धत असते. याशिवाय मुलांना अभ्यास समजून घेणेही काहीवेळेस कठीण होते. अशातच मुलांच्या आजूबाजूला अभ्यास करताना सकारात्मक वातावरण निर्माण केल्यास त्याचे नक्कीच अभ्यासात मनं लागू शकते.

अत्याधिक स्क्रिनटाइम
मुलांचे अभ्यासात मनं न लागण्यामागील आणखी एक कारण म्हणजे अत्याधिक स्क्रिनटाइम असू शकतो. खासकरुन, अभ्यासाच्या वेळेत मोबाइल, टीव्ही पाहणे. अशातच मुलं ज्यावेळी अभ्यासाला बसले असेल तेव्हा सोशल मीडिया किंवा स्क्रिनटाइम कमी करावा.

आत्मविश्वासाची कमतरता
मुलाकडून वारंवार चुका होत असल्यास किंवा त्याची दुसऱ्यासोबत तुलना करत असाल तर पालकांनी असे करणे टाळावे. जेणेकरुन मुलामध्ये आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होऊ शकते.

=======================================================================================================

हेही वाचा : 

लव्ह बॉम्बिंग ते गॅसलाइटिंग, नात्यातील हे 6 संकेत मानले जातात रेड फ्लॅग

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

=======================================================================================================

शाळेतील वातावरण
शाळेतील मित्रपरिवाराचे किंवा शिक्षकांच्या वागणूकीचा मुलावर परिणाम होऊ शकतो. अशातच अभ्यास करताना देखील मुलाचे लक्ष लागू शकत नाही. सततच्या गोंधळामुळे मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.(Parenting Tips)

या गोष्टींची पालकांनी घ्या काळजी
-मुलांचे अभ्यासात मनं लागत नसल्यास लहान लहान सेशनमध्ये त्याचा अभ्यास करुन घ्या.
-अभ्यापूर्वी मुलाला प्रेरणादायी आणि सकारात्मक गोष्टी समजावून सांगा.
-अत्याधिक स्क्रिनटाइम वापरणे टाळा.
-मुलाची दुसऱ्या मुलांसोबत तुलना करणे टाळा. काही गोष्टी मुलाच्या कलेने घ्या.
-मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका.
-मुलांच्या अभ्यासासाठी वेळापत्रक तयार करा.
-मुलाला आवडीच्या विषयापासून अभ्यास करण्यास सुरुवात करू द्या.
-मुलांना नेहमीच खेळण्यासाठी आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्या. या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणेही महत्वाचे आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.