आपल्या मुलांना उत्तम नागरिक बनवण्यासाठी आई-वडिलांची शिकवण फार महत्त्वाची असते. पालक जे बोलतात, करतात त्याच प्रमाणे मुलंही वागतात. पालकांचा प्रभाव हा मुलांच्या आयुष्यावर जरुर पडतो. मुलांना योग्य शिस्त, शिकवण लावणे हे केवळ पालकांच्याच हातात असते. अशातच वडिलांच्या वागण्याचा प्रभाव मुलांवर अधिक होतो. वडिलांनी सांगितलेल्या काही गोष्टी मुलाला खरंच आदर्श बनवतात. तर त्या कोणत्या अशा गोष्टी आहेत हे जाणून घेऊयात. (Parenting tips)
-दुसऱ्यांचा सन्मान करणे
कोणत्याही व्यक्तीचा सन्मान करणे उत्तम बाब आहेच. पण जर तुम्ही दुसऱ्यांचा सन्मान करत असाल तर मुलांना सुद्धा असे करण्यास सांगा. त्याचसोबत हे सुद्धा सांगा की, कोणत्याही व्यक्तीचा सन्मान केल्याने, त्यांच्याशी व्यवस्थितीत वागल्याने आपण लहान होत नाही. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीची इज्जत करता तेव्हा तो सुद्धा तुमची इज्जत करेल.
-चुक स्विकारणे
नेहमीच आपल्या मुलांना आपली चुक मान्य करण्यास शिकवले पाहिजे. काही लोक चुक झाल्यानंतर आपणच बरोबर अशी भावना ठेवतात. मात्र जर तुम्हीच घराचे प्रमुख असाल आणि अशी चूक करत असाल तर याचा परिणाम मुलावर होईल. त्यामुळे आपली चूक मान्य करण्यास शिका. मुलांना सुद्धा अशी शिकवण लावा. जेणेकरुन त्यांच्याकडूनही चूक झाल्यास ते माफी मागतील.
-पराभवाला चुकीचे न समजणे
बहुतांश मुलं एखाद्या स्पर्धेत हरल्यानंतर रडायला लागतात. यामुळे हळूहळू मुलं हरण्याच्या भीतीपोटी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यास नकार देते. एका वडिलांच्या नात्याने तुम्ही मुलाला पराभव येणे ही चुक किंवा वाईट गोष्ट नाही हे समजावून सांगा. पराभवातून शिकण्यास सांगा. मुलांना मेहनत करण्यास प्रोत्साहन द्या.
-प्रेम दाखवण्यास शिकवा
जर एक वडिल दुसऱ्यांसोबत प्रेमाने वागत असतील तर मुलं सुद्धा त्यांच्यासोबत किंवा इतरांसोबत तसेच वागतील. जर वडिलच कडक, रागीट असतील तर मुलही तशीच होतील. त्यामुळे मुलांना दुसऱ्यांशी प्रेमाने वागण्यास शिकवा. (Parenting tips)
-कोणतेही काम लहान मोठे नसते
घराचा प्रमुख असल्याच्या कारणास्तव जर तम्ही कामालाच अधिक महत्त्व दिले आणि घरातील कामांना कमी लेखले तर मुलं सुद्धा तसाच विचार करतील. घरातील काम मुलंच नव्हेच तर मुलींनीच केली पाहिजेत ही विचारसरणी बदलली पाहिजे. असे केल्याने घरातील मुलं ही तसेच वागतील. त्यामुळे मुलांना सांगा कोणतेही काम लहान-मोठे नसते.
हेही वाचा- लाजाळू मुलांची पालकांनो अशी घ्या काळजी