मुलांवर त्यांच्या पालकांचे खुप प्रेम असते. प्रत्येक मुलं त्याच्या आई-वडिलांनी आपले कौतुक करावे म्हणून काही ना काही तरी करतात. पण कधीतरी मुलं चुकल्यानंतर बहुतांश पालक त्यांना ओरडतात. याचा अर्थ असा होत नाही की, त्यांचे मुलांवरील प्रेम कमी झालेले आहे. या सर्व गोष्टी मुलांच्या पालपोषणाचा एक भागच आहे. काही पालक असे असतात की, त्यांना राग आल्यानंतर मुलांना मारतात किंवा टोमणे मारतात. अशातच त्यांचे मन दुखावले जाऊ शकते. मुलं ही निरागस असतात, त्यामुळे जरी त्यांनी चुका केल्या तर त्यांच्यावर लगेच हात उगारु नका. तसेच जर तुम्ही सुद्धा मुलांना अशा प्रकारचे टोमणे मारत असाल तर ती चुक करु नका. यामुळे तुमच्यात आणि मुलामधील नात्यात दूरावा येऊ शकतो. (Parenting Tips)
-मुलांच्या हट्टावरुन टोमणे मारु नका
काही वेळेस मुलं त्यांच्या हट्टापोटी एखादी गोष्ट घेऊन देण्यासाठी किंवा करण्यासाठी पालकांच्या मागे लागतात. त्यांच्या हट्टाला नाटक करतोय असे बोलू नका. तुमचे असे बोलणे त्यांचे मन दुखावले जाऊ शकते.
-तू मुर्ख आहेस असे बोलणे टाळा
काही पालक रागात आपल्या मुलांना तू मुर्ख आहेस असे म्हणतात. जर तुम्ही मुलांना असा टोमणा मारत असाल तर त्यांच्यामधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. असे केल्याने मुलांच्या भावानांना ठेच पोहचते. तसेच मुल ही दुसऱ्यांच्या तुलनेत त्यांना कमी लेखतात.
-तुला सहन करणार नाही
मुलांनी चुकी केल्यानंतर पालक असे म्हणतात की, तुझ्या वाईट सवय खपवून घेणार नाही. मात्र मुलांना सुधारण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे ठीक नाही. असे केल्याने मुलांच्या मनात भीती निर्माण होते. त्यामुळे मुलं तुमच्यापासून काही गोष्टी लपवू शकतात.
-तुला काय प्रॉब्लेम आहे
काही पालक असे असतात की, त्यांच्या बोलण्यावरुन मुलं त्यांना काही प्रश्न विचारतात. यावेळी मुलांना काही पालक तुला काय करायचय असे बोलून जातात. हा सुद्धा टोमणा तुमच्या मुलाला मारु नका. जेव्हा तुम्ही त्याला असा टोमणा माराल तेव्हा त्याला तो नेहमीच चुकीचा असल्यासारखे वाटत राहिल. (Parenting Tips)
हे देखील वाचा- मुलांमध्ये साकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
-तु असाच का आहे
मुलांसाठी सतत बावळट, बुद्धू अशा काही शब्दांचा वापर करु नका. अशा प्रकारचे शब्द तुमच्यासह मुलासाठी वापरणे अयोग्य आहे. असे शब्द वारंवार वापरल्यास मुलामधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे.