Home » संवेदनशील मुलाची अशी घ्या काळजी

संवेदनशील मुलाची अशी घ्या काळजी

by Team Gajawaja
0 comment
Parenting Tips
Share

तुमचे मुलं इतरांपेक्षा स्पेशल असेल तर पालकांची जबाबदारी आहे की, त्याला समजून घेतले पाहिजे. त्याचसोबत त्याचे उत्तम पालनपोषण केले पाहिजे. मात्र काही पालक आपल्या मुलाने चांगले वागावे म्हणून त्याच्यासोबत कठोर वागतात. पण कठोर वागण्याचा परिणाम ही मुलांवर होतो. अशातच जर मुलं स्वभावाने अगदी संवेदनशील असेल तर तो तुमच्या अशा वागण्याने लगेच दुखावला जाऊ शकतो. अशा मुलांना आपल्या पालकांची साथ हवी असते. त्यांच्या प्रेमाची त्यांना जोड हवी असते. अधिक संवेदनशील असलेल्या मुलांची काळजी ही खास पद्धतीने घेतली पाहिजे. (Parenting Tips)

-भावना समजून घ्या आणि स्विकारा
जर तुमचे मुलं अधिक संवेदनशील असेल तर याचा अर्थ असा होतो की, तो कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये सतत असतो. अशातच पालकांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. अशी मुलं लगेच आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. मात्र ते नेहमीच इमोशनल असल्यासारखे राहतात. त्यामुळे मुलाला त्याच्या गुणांसह स्विकारा.

-बदलण्याचा प्रयत्न करु नका
आपण नेहमीच पाहतो की, पालकांना आपल्यानुसार मुलांनी वागावे असे वाटत राहते. मात्र जर तुमचे मुलं अधिक संवेदनशील असेल तर त्याला बदलण्याचा प्रयत्न करु नका. असे असू शकते की, अधिक संवेदनशील असणे फार मोठी गोष्ट नाही. पण तो तुमच्या मुलाच्या आयुष्याचा एक भाग आहे असे पालकांनी समजून घेतले पाहिजे. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करु नये. जर तुम्ही त्यांना त्यांची एखादी सवय बदलण्यास दबाव टाकत असाल तर ते अधिकच एकटे एकटे राहतील.

-प्रेम व्यक्त करा
संवेदनशील मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची गरज असते. त्यामुळे पालकांची जबाबदारी असते की, त्यांनी आपल्या मुलावर प्रेम करावे. अन्यथा तुमच्या मुलाला असे वाटू शकते की, तो इतरांपेक्षा फार वेगळा आहे. अशातच त्याच्यात नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. (Parenting Tips)

हेही वाचा- मुलांसाठी बँक खाते सुरु करणार असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

-मुलांना मार्गदर्शन करा
जर तुमचे मुलं अधिक संवेदनशील असेल तर त्यांना आपल्यासाठी कोणते बेस्ट ऑप्शन आहेत हे निवडण्यास त्यांना समस्या येऊ शकते. असे ही असू शकते की,मुलाला कठीण परिस्थितींपासून दूर रहायचे आहे. पण नक्की कशी स्थिती हाताळावी हे कळत नाही. तेव्हा पालकांनी मार्गदर्शन करावे. त्यांच्याशी संवाद साधा आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या काही समस्या दूर होऊ शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.