प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते. दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. त्यांच्यात काही ना काही तरी साम्य असतेच असते. आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेक व्यक्ती बोलक्या असतात तर काही व्यक्ती शांत असतात. काही बिनधास्त बेधडक असतात तर काही लाजाळू असतात. काही बोल्ड तर काही जरा घाबरट असतात. यात कमीपणी वाटण्याचे काहीच कारण नसते. कारण हा प्रत्येकाचाच स्वभाव असतो. अनेक लोकं लहानपणापासूनच लाजाळू असतात. त्याचा हा स्वभाव अनेकदा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून आधीपासूनच आपण यावर काहीतरी उपाय करून मुलांचा हा स्वभाव बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. (Parenting Tips)
मुलं लहान असतांनाच त्यांच्या आई वडिलांना किंवा घरातील इतर लोकांना त्यांच्या स्वभावाचा अंदाज येतो. काही मुलं बोलक्या स्वभावाची मस्तीखोर असतात तर काही लाजरीबुजरी असतात. मुलांनी बडबड करणं तर सहाजिकच सामान्य गोष्ट आहे पण खूप जास्त लाजरा-बुजरा स्वभाव असणे समस्या बनू शकते. अशा मुलांना इतर मुलांसारखं हुशार आणि बोलके बनवण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांमध्ये बदल घडवू शकतात. बिनधास्त असणाऱ्या मुलांपेक्षा लाजाळू मुलांना खूप अडचणीला सामोरे जावे लागते. (Marathi)
अशा मुलांबाबत त्यांच्या पालकांना सुद्धा चिंता वाटत असते, कारण ही लाजाळू मुले लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत, एकटी एकटी राहतात. आपल्या या मुलांचा स्वभाव बदलला पाहिजे असे पालकांना सुद्धा वाटत असते. पण त्यासाठी नेमके काय करावे हे पालकांना माहित नसते. आई वडिलांचा स्वभाव देखील लाजरा असेल तर मुलाचा स्वभाव सुद्धा तसाच होण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीच्या काळात जर मुलं एकटे राहिले तर पुढे जाऊन त्याच्यातील सोशल स्किल्स डेव्हलप होत नाहीत आणि परिणामी ते लाजाळू बनतात. ज्या मुलांवर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक चांगले बनण्याकरता दबाव टाकला जातो, त्यांच्यात देखील फेलीयरची भीती निर्माण होते, जी पुढे जाऊन लाजरेपणाचे रूप घेऊ शकतात. (Todays Marathi Headline)

मुलांमध्ये लाजाळूपणा पाहून पालकांना वाटते की ही एक सामान्य गोष्ट आहे आणि जस जसे मुल मोठे होईल तस तसा त्याचा हा स्वभाव बदलत जाईल. मात्र इथे एक गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायला हवी. नवीन लोकांना भेटल्यावर जर मुल लाजत असले तर ही एक सामान्य गोष्ट आहे पण कोणत्याही व्यक्तीशी भेटल्यावर मुल लाजत असेल वा गप्प गप्प राहत असेल, तसेच सजाण झाल्यावर सुद्धा त्याचे हे वर्तन बदलत नसले तर ही एक चिंतेची गोष्ट असू शकते. (Top Marathi News)
जर तुमचे मूल तुमच्याबरोबर आणि घरात इतर सदस्यांबरोबर सामान्यपणे राहत असेल. पण, घराबाहेर पडताच तो पूर्णपणे शांत झाला असेल, तर त्याला सर्वांसमोर ओरडू देऊ नका. त्यांच्या समसय्या समजून घ्या. थोडक्यात, आपल्या मुलांचे चांगले मित्र व्हा. प्रत्येक मुलाची स्वतःची क्षमता असते, म्हणून एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. अनेक वेळा पालक आपल्या मुलाच्या लाजाळू स्वभावाचा वारंवार सर्वांसमोर उल्लेख करतात, तेव्हा हळूहळू ही गोष्ट मुलांच्या मनातही घर करू लागते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याला आपले विचार इतरांसमोर मांडण्यास प्रवृत्त केले पाहिजे. “तो असाच आहे”, “तो नाही बोलणार!” असे वाक्य वापरू नका, कारण यामुळे मूल स्वतः मग त्याचा पुनरुच्चार करते. आणि पुढे जाऊन त्याचा तो स्वभाव बनतो. (Latest Marathi Headline)
जर मुलाल एकटे राहणे आवडत नसेल तर त्याला दुसऱ्यांसमोर काहीतरी बोल असे बोलणे चुकीचे आहे. त्याचसोबत तो कोणाला ओळखतच नसेल तर त्यावेळी ही त्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेशरराइज करू नये. यामुळे तो घाबरू शकते. तसेच तो दुसऱ्यांसोबत कंम्फर्टेबल होत नसेल तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये. पालक नेहमीच आपल्यासोबत त्यांना घेऊन जाताना दुसऱ्यांशी कसे वागावे याबद्दलच्या काही गोष्टी सांगतात. पण जर मुलं लाजाळू असेल आणि पाहुण्यांसमोर बोलण्यास लाजत असेल तर त्यावेळी त्याच्यावर ओरडू नये. अथवा बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्याला आत्मविश्वासू बनवायचे असेल तर पालकांनी त्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्याच्याशी प्रेमाने वागले तरच तो दुसऱ्यांसोबत कंम्फर्टेबल होईल. (Top Trending News)
=========
Phone Security Tips : फोन चोरी झाल्यास घाबरू नका, डेटा आणि पैसे सुरक्षित राहण्यासाठी लगेच करा हे काम
=========
पालकांप्रमाणेच मुलांचंही एखाद्या गोष्टीत आपले मत असू शकते. अशा वेळी आपले मत मुलांवर लादण्यापेक्षा मुलांची देखील बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय घ्या. प्रत्येक मूल हे आपल्या पालकांचं अनुकरण करत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हव्या असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणाव्या लागतील, म्हणजेच तुम्ही स्वतःच त्यांचे आदर्श व्हा. मुलाला व्यक्तीमत्त्व विकासाच्या क्लासेसला घालू शकता. या क्लासेस मध्ये समाजात कसे वागावे, स्वत:ला कसे विकसित करावे, वर्तणूक कशी सुधरावी, संवाद कौशल्य कसे वाढवावे यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात. अशा क्लासेस मध्ये इतरही त्याच स्वभावाची मुले असल्याने मुलाच्या मनातील लाजाळूपणाचा न्यूनगंड जाऊ शकतो. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
