Home » मुलांना शिकवा ‘या’ सवयी, आरोग्य राहिल सुदृढ

मुलांना शिकवा ‘या’ सवयी, आरोग्य राहिल सुदृढ

by Team Gajawaja
0 comment
Parenting tips for teenager child
Share

अल्पवयीन ते तारुण्यातील मुलं ही अल्लड असतात. यावेळी त्यांचे शारिरक नव्हे तर मानसिक रुपात ही बदल होत राहतात. टीनएज वयातील मुलं आपल्या परिवार आणि पालकांऐवजी मित्रांसोबत राहणे अधिक पसंद करतात. या वयात मुलांना वाईट संगत आणि सवयी लागू शकतात. अनहेल्दी डाएट, वेळेआधीच जेवणे, कधी ही झोपणे आणि स्क्रिन टाइमची मर्यादाच नसणे. जर पालकांनी मुलांना काही हेल्दी सवयी लावल्या तर त्यांचे आरोग्य आयुष्यभर सुदृढ राहिल. त्याचसोबत त्याचे आयुष्य सोप्पे ही होईल. (Parenting tips for teenager child)

हेल्दी इटिंग रुटीन
हेल्दी फूड्सचा अर्थ असा होत नाही की केवळ तेच खाल्ले पाहिजे. तर यावेळी तुम्हाला एका निश्चित वेळी जेवायचे असते. यामध्ये नाश्ता करणे ते नाश्ता करण्याची वेळ, टीवी पाहण्याची वेळ किंवा परिवारासोबत एकत्रित घालवण्याचीवेळ अशा काही गोष्टींचा समावेश असतो. तसेच दररोज आठ ग्लास तरी पाणी प्यावे.

दररोज व्यायामाची सवय
टीएनज मुलांना सकाळी उठून चालायला जाण्याची सवय लावा. एखादा आउटडोर गेम, ट्रॅम्पोलिनवर उड्या मारणे अशा काही अॅक्टिव्हटी केल्याने मुलं अॅक्टिव्ह राहू शकतात. मुलांसाठी तुम्ही एक वेळापत्रक ही तयार करु शकता. त्यात तुमचे मुलं कितीवेळ फिजिकल अॅक्टिव्हिटी करतो हे सुद्धा नमूद करा.

नियमित रुपात फ्लॉस करा
टीएनज मुलांना रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करण्याची सवय लावा. त्यांना एक ते दोन मिनिटे फ्लॉस करणे शिकवा. यामुळे त्यांचे आरल हेल्थ उत्तम राहिल आणि हिरड्यांमध्ये संक्रमण ही होणार नाही. यामुळे मुलांचे दात हेल्दी राहतील. (Parenting tips for teenager child)

गुड स्लीपिंग रुटीन बनवा
एक उत्तम स्लीपिंग रुटीनला फॉलो केल्याने टीएनज मुलांना हेल्दी राहण्यास मदत होईल. त्यांची झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ ठरवा. झोपण्यापूर्वी हलका आहार घ्यावा, कोमट गरम पाण्याने अंघोळ करावी, शांत म्युजिक ऐकावे अशा काही सवयी लावा. दररोज मुलाला जर ही शिस्त लावली तर तो आयुष्यात सुद्धा शिस्तीत वागेल.

योगा आणि मेडिटेशन
दररोज योगाभ्यास आणि मेडिटेशन केल्याने टीएनज वयातील मुलं अधिक सक्रिय आणि फिट राहतात. योगासन आणि मेडिटेशनमुळे टीएनज मुलांना मानसिक आणि शारिरीक रुपात हेल्दी ठेवण्यास मदत होते. तसेच तणाव ही दूर होतो.

हेही वाचा- कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या मुलीला शिकवा ‘या’ गोष्टी

ऑनलाईन पासून दूर ठेवा
खुप तास ऑनलाईन राहणाऱ्या मुलांना वाईट सवयी लागू शकतात. तसेच यामुळे ते अधिक संवेदनशील ही होतात. इंटरनेटच्या सवयीमुळे त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज कमी होते. तसेच डोळ्यांवर ही परिणाम होतो. त्यामुळे मुलांना खुप वेळ इंटरनेटवर वेळ घालवण्यापासून दूर ठेवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.