प्रत्येक पालकांना वाटत असते की, त्यांच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि त्यांना आयुष्यात यश मिळावे. मात्र घरातील काही कारणांमुळे काही पालक आपल्या मुलांना उत्तम हॉस्टेल किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा ऑप्शन निवडतात. तर काही पेरेंट्स नेहमीच आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याने आपल्या मुलांना काही गोष्टींची जाणीव करुन देण्यासाठी हॉस्टेलमध्ये पाठवतात. बोर्डिंग स्कूल किंवा हॉस्टेलमध्ये पाठवण्यापूर्वी काही पालकांच्या मनात प्रश्न ही उपस्थितीत राहतात. जसे की, तेथील वातावरण कसे असेल, त्याचा मुलावर चांगला परिणाम होईल का किंवा त्याला वाईट गोष्टींची सवय तर लागणार नाही ना असे विविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी पालकांनी आपल्या मुलाला हॉस्टेल किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार असाल तर काही गोष्टींचा विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विचारपूर्वक हा निर्णय पालकांनी सुद्धा घेतला पाहिजे. (Parenting Tips)
मुलाला बोर्डिंग स्कूल किंवा हॉस्टेलमध्ये पाठवण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
-मुलाचे मतं जाणून घ्या
मुलाला हॉस्टेल किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार असाल तर सर्वात प्रथम तुमचे मुलं तेथे जाण्यास तयार आहे का हे त्याला विचारा. कारण काही गोष्टी त्याच्याकडून जाणून घेणे सुद्धा फार महत्वाचे असते.
-योग्य वयात हॉस्टेलमध्ये पाठवा
कमी वयातच मुलाला आपल्यापासून दूर करणे हे तुमच्या नात्यामध्ये नकारात्मकता निर्माण करु शकते. अशातच त्याला बोर्डिंग स्कूल किंवा हॉस्टेलमध्ये पाठवायचे जरी झाल्यास तरी तो १४-१५ वर्षाचा तरी असू द्या.
-योग्य कारण निवडा
मुलाला जेव्हा तुम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवणार असाल तर त्यामागील योग्य कारण निवडा. मुलाला कधीच दाखवून देऊ नका की, त्याला शिक्षा म्हणून बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जात आहे. यामुळे त्याच्या मानसिकतेवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.
-मुलाच्या प्रश्नांची उत्तरे इमानदारीने द्या
जेव्हा तुमचे मुल या विषयावर काही प्रश्न विचारेल तेव्हा त्याची इमानदारीने उत्तरे द्या. जसे की, तुम्ही त्याला बोर्डिंग स्कूल किंवा हॉस्टेलमध्ये का पाठवत आहात.
हे देखील वाचा- रात्रभर तुमचे मुलं झोपत नाही? ‘हे’ उपाय वापरुन पहा
-हॉस्टेलमधील वातावरण कसे आहे त्याबद्दल माहिती करुन घ्या
जेथे तुम्ही तुमच्या मुलाला पाठवणार आहात तेथील वातावरण कसे आहे हे नक्की जाणून घ्या. जसे की, शिक्षक अनुशासनाच्या नावावर शोषण तर करत नाही ना? (Parenting Tips)
-मुलाच्या होकाराकडे सुद्धा द्या लक्ष
मुलाला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यापूर्वी त्याला खरंच तेथे जायचे आहे ना? तो सुद्धा त्यासाठी तयार आहे ना अशा गोष्टी लक्षात घ्या आणि योग्य तो निर्णय तुम्ही घ्या.