घरातील लहान मुलं ही मोठ्या माणसांचे अनुकरण करुनच काही गोष्टी शिकतात याबद्दल वादच नाही. अशातच घरातील एकमेकांसोबत असलेली वागणूक ही मुलावर ही प्रभाव पाडते. त्यामुळे काही वेळेस मुलं ही उद्धट स्वभावाची होतात आणि सहाजिकच ही एखाद्याला उलटी उत्तर देण्यासाठी सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. आता फक्त टीएनज नव्हे तर लहान मुल सुद्धा आपल्या पालकांना उलट उत्तर देतात. जेव्हा एखाद्या लहान वयाच्या व्यक्तीकडून आपला अनादर केला जातो तेव्हा फार वाईट वाटते. तसेच आपल मुलं असा का वागतोय म्हणून आपण त्रस्त होते. अशातच तुमचे मुलं सुद्धा तुम्हाला उलटं उत्तर देत असेल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.(Parenting tips)
-आपल्या मुलासोबत बोला
मुलं अधिक वाईट किंवा बेशिस्त वागण्यामागे त्याचे काही कारण असू शकते. अशातच मुलावर हात उचलणे किंवा ओरडण्याची चुक करु नका. त्याचे बोलणे ऐकून घ्या आणि नंतर त्याच्याशी बोला. तसेच त्याचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाला नाही बोलणे शिका. तसेच मुलाशी बोलताना आपले शब्द सुद्धा जपून वापरा.
हे देखील वाचा- ‘असा’ देश, जिथे मूल जन्माला येताच होते १ वर्षाचे
-पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वागणूक
जेव्हा मुलं चुकीच्या शब्दांचा वापर करतात तेव्हा पालक खुप संतप्त होतात. परंतु त्यावेळी त्यांना समजवण्यासाठी योग्य मार्ग कोणता याचा विचार पालकांनी केला पाहिजे. तसेच गरज भासल्यास मुलाला पॉझिटिव्ह-निगेटिव्ह गोष्टींमधील फरक सुद्धा समजावून सांगा. जेव्हा तो चांगले काम करेल तेव्हा त्याच्यावर आनंद व्यक्त करा किंवा त्याला आवडणारी एखादी गोष्ट द्या. यामुळे तुमचे मुलं तुमच्यासह इतरांशी सुद्धा व्यवस्थितीत वागण्याचा प्रयत्न करेल.
-रोल मॉडल व्हा
आपल्या मुलांच्या समोर तुम्ही नेहमीच एक आदर्श व्यक्ती म्हणून वागा. जेव्हा तुमचे मुलं चांगल्या गोष्टी पाहिल तेव्हा तो सुद्धा त्याच गोष्टी शिकेल. यामुळे पालकत्वासह स्वत: च्या वागणूकीत सुद्धा काहीसा फरक तुम्हाला जाणवेल.(Parenting tips)
-प्रत्येक गोष्ट ऐकून घेऊ नका
जेव्हा तुमचे मुलं तुम्हाला उलट उत्तर देत असेल तर त्याचे असे बोलणे किंवा वागणे अजिबात खपवून घेऊ नका. तसेच त्याची प्रत्येक गोष्ट ऐकून सुद्धा घेऊ नका. त्याला समाजून सांगा वडिलधाऱ्या माणसांशी कसे वागले पाहिजे.
-दुसऱ्या पालकांशी सुद्धा बोला
जर तुम्हाला कळत नसेल तुम्हाला मुलासोबत नक्की कसे वागायचे तर तुम्ही दुसऱ्या पालकांशी बोला. तसेच आपले मुलं ज्या पद्धतीने वागतेय त्या बद्दल त्यांच्याशी बोलून त्यांचा सल्ला जरुर घ्या.