असे म्हटले जाते की, एक शिक्षित मुलगी दोन परिवारांना शिक्षित करते. ही म्हण आजच्या काळासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण सध्या मुलगा असो किंवा मुलगी यांना एकसमान वागवले जाते. प्रत्येक ठिकाणी महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकालाच कॉलेजला जावे लागते. येथूनच आयुष्याचा खरा प्रवास सुरु होतो. खरंतर कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येकासाठी हा काळ असा असतो की, जेथे त्याचे भविष्य सुरु होते. कॉलेजमध्ये राहून कोणत्या संगतीत राहतो यावरुन त्याच्या पुढील आयुष्याच्या वाटचालींचा अंदाज लावला दातो. अशातच तुम्ही तुमच्या मुलीला कॉलेजला जाण्यापूर्वी काही गोष्टी समजावून सांगितल्या तर समस्या येणार नाहीत. (Parenting tips)
आपल्या कामावर फोकस ठेवणे
जर तुमची मुलगी पहिल्यांदाच कॉलेजला जाणार असेल आणि तिने चुकीच्या संगतीत राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर ही सामान्य बाब आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तिला सर्वांपासून दूर राहण्यास सांगाल. अशातच मुलीला मिळूनमिसळून राहण्याचा सल्ला द्या. परंतु आपल्या कामावर ही फोकस ठेवण्यास ही सांगा.
चांगल्या-वाईट गोष्टींची समज द्या
कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या मुलीला समजूतदार बनवण्यासाठी पालकांची यामध्ये फार महत्वाची भुमिका असते. अशातच गरजेचे आहे की, चांगल्या-वाईट गोष्टींची समज तिला दिली पाहिजे. कारण हे प्रत्येक मुलाला किंवा मुलीला सांगणे महत्वाचे असते. तसेच मुलीला सुद्धा समजले पाहिजे आपल्यासाठी कोणता मित्रमैत्रीण योग्य आहे की नाही.
क्लासमध्ये उपस्थिती जरुरी
कॉलेजला जाणाऱअया मुलीने विशेष लक्षात ठेवले पाहिजे की, तिला प्रत्येक क्लाससाठी उपस्थितीत रहायचे आहे. कारण कोणतेही लेक्चर बंक झाल्यास तुम्ही शिक्षकांच्या नजरेत चुकीचे ठरु शकता. या व्यतिरिक्त अशा मित्रमैत्रिणींपासून दूर रहावे जे सतत क्लास बंक करुन टाइमपास करतात.
जबाबदाऱ्या समजून घेणे
मुलीला जबाबदाऱ्यांबद्दल जरुर सांगावे. तिला सांगा की, उत्तम शिक्षण घेण्याचे नक्की काय फायदे असतात. तिला क्लास शिवाय लायब्रेरीत सुद्धा जाण्यास सांगा. (Parenting Tips)
हेही वाचा- मुलांमध्ये साकारात्मकता निर्माण करण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
गरजेचे नाही नेहमीच कूल दिसले पाहिजे
शाळा असो किंवा कॉलेज, सर्व ठिकाणी शिक्षणच महत्वाचे असते. प्रत्येक ठिकाणी एक ग्रुप असा असतोच जो नेहमीच कूल दिसण्याचा प्रयत्न करतो. अशातच तुमच्या मुलीला सांगा की, नेहमीच कूल दिसणे हे फार महत्वाचे नाही. याउलट उत्तम अभ्यास करणे किती महत्वाचे हे समजावून सांगा.