Parenting Tips : मुलांचे पालनपोषण करणे सोपे नसते. मुलांना प्रत्येक प्रकारे मजबूत बनवणे फार गरजेचे असते. केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही मुलं मजबूत असावीत. पण काही मुलांना सतत रडण्याची समस्या असते. यामुळे मुलं काही गोष्टी करण्यासाठीही घाबरात. अशातच मुलांना मजबूत बनवण्यासाठी पालकांनी काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
प्रत्येक काम व्यवस्थितीत होत नसल्यास
ज्यावेळी तुमचे मुलं एखाद्या गोष्टीवर रडत असल्यास समजून जा प्रत्येक गोष्ट त्याच्या मनानुसार होत नाहीये. स्थितीसोबत मॅनेज करणे गरजेचे आहे. मुलांना असे शिकवा की, प्रत्येक स्थितीत मजबूत कसे राहायचे. याशिवाय समस्येच्या काळात कसे रिअॅक्ट करावे.
मुलाला बोलण्याची संधी द्या
काही पालक मुलांना अधिक बोलू देत नाहीत. यामुळेच मुलं त्यांच्या भावना कधीच मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. अशातच मुलं भावनात्मक मजबूत होत नाहीत. यामुळे मुलांना बोलण्याची संधी द्या.
आत्मविश्वास वाढवा
मुलांमधील आत्मविश्वास वाढलेला असेल तर ते कोणतीही गोष्ट करण्यासाठी घाबरत नाही. ते प्रत्येक मुद्द्यावर आपले विचार स्पष्टपणे मांडतात. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतात. अशातच मुलांमधील आत्मविश्वास वाढवणे अत्यावश्यक आहे. यासाठी मुलांना त्यांच्या पसंतीची एखादी कला अवगत करण्यास सांगू शकता. (Parenting Tips)
प्रत्येक गोष्टीवर अडवणूक करू नका
मुलं चूक करतात याचा अर्थ असा होत नाही की, त्यांच्यावर प्रत्येकवेळी ओरडले पाहिजे. मुलं चूक करणार नाही तर शिकणार कसे हे पालकांनी लक्षात ठेवावे. याशिवाय मुलांना सतत एखाद्या गोष्टीपासून अडवणूक करू नका.