महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. 22 ऑक्टोबरपासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल व्हायला लागले. 30 ऑक्टोबर रोजी या सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली आहे. आता पक्षाते अधिकृत उमेदवार प्रचारासाठी लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. आता या सर्वच मतदार संघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणूक अर्जात भरलेला उमेदवारांचा तपशील बाहेर येत आहे. यात कुठल्या उमेदवाराकडे किती संपत्ती, किती गाड्या, किती शिक्षण असा सर्व तपशील जनतेसमोर उघड येतो. यातून एक नाव चर्चेत आलं आहे. ते नाव म्हणजे, पराग शहा. घाटकोपर मतदार संघासाठी भाजपाचे उमेदवार असलेल्या पराग शहा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. शहा हे आमदार असून ते या मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राताली सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची नोंद झाली आहे. (Parag Shah)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 रोजी जाहीर होईल. यासाठी उमेदवारी अर्ज आले असून त्यातून उमेदवारांची माहिती उघड होत आहे. यातूनच मुंबईतील भाजपचे घाटकोपर पूर्व उमेदवार पराग शहा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे. गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 575% वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती 550.62 कोटी रुपये होती. विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करतांना प्रत्येक उमेदवाराला त्याच्या एकूण मालमत्तांसदर्भात तपशील सादर करावा लागतो. याच प्रतिज्ञापत्रात शहा यांनी व्यवसाय आणि गुंतवणूक हे आपल्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचे सांगितले आहे. पराग शहा यांनी या प्रतिज्ञापत्रात 422 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची नोंद केली आहे. (Political News)
पराग शहा यांनी आपली जंगम मालमत्ता बँक खाती, ठेवी, शेअर्स आणि बाँड्स, वाहने आणि दिलेली कर्जे या स्वरूपात आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या, मानसीच्या मालमत्तेचाही समावेश आहे. त्यांच्या पत्नीच्या नावानं महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही शेती आणि बिगरशेती जमीन आहे. त्याच्याकडे 2.6 कोटी रुपयांचे दागिने, 8.98 लाख रुपयांचे स्कोडा रॅपिड आणि 2.47 कोटी रुपयांची फेरारी आणि दागिनेही असल्याची नोंद करण्यात आली आहे. शाह यांनी 2017 मध्ये बीएमसी निवडणूक लढवली होती आणि त्यांची संपत्ती 690 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. बीएमसीच्या इतिहासातीलही शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. पराग शहा हे सध्या घाटकोपर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या रिअल इस्टेट डेव्हलपच्या दोन कंपन्या आहेत. त्यांचे अनेक प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये आहेत. पराग शहा हे उस्मानिया विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहेत. त्यांनी 2017 च्या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांचा चांगलाच वर्चस्मा आहे. भाजपाचा हा मजबूत गड समजला जातो. (Parag Shah)
======
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
====
या मतदार संघात गुजराती, जैन समजाची मते अधिक आहेत. त्यामुळेही पराग शहा यांचा विजय निश्चित समजला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराग शहा यांना या जागेवर 57 टक्के मते मिळाली होती. त्याच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराला फारच कमी मते पडली होती. पराग शहा यांच्यापूर्वीही हा गड भाजपाकडेच होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मेहता प्रकाश मंचूभाई हे मतदार संघातून विजयी झाले होते. 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत पराग शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवार असले तरी त्यांच्या खालोखाल भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचा नंबर लागतो. लोढा हे मलबार हिलमधून निवडणूक लढवत असून त्यांची संपत्ती 441 कोटी रुपये आहे. तिसऱ्या स्थानावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी असून त्यांची 220 कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. (Political News)
सई बने