ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा ना अॅमेझॉन होते ना फ्लिपकार्ट, ज्याच्या माध्यमातून आपण सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी ऑर्डर देऊ शकत होते. भारतात ऑनलाईन मार्केटची किती शक्यता आणि गरज आहे हे अंबरीश मुर्ति आणि आशीष शाह यांनी अचूक ओळखले. यापूर्वी दोघांनी एका कंपनीसोबत भारतासह फिलिपींस आणि मलेशियात खुप उत्तम काम केले होते. त्यानंतर वर्ष २०११ मध्ये त्या दोघांनी पेपरफ्राय कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. (Pepperfry Success Story)
कंपनी उभी करणे आणि तिला यशाच्या मार्गावर नेणे काही सोप्पे नव्हते. सर्वात प्रथम अंबरीश मुर्ति यांनी जी खासगी इक्विटी तयार केली त्याच्यासोबत त्यांनी प्रथम ते ओळखणाऱ्या लोकांसोबत जोडगले गेले. त्या लोकांना त्यांना खुप पाठिंबा मिळाला. सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ सहा लोकांची एक लहान टीम होते. मात्र हे ऐवढेच पुरेसे नव्हते. त्यांना काही काळातच कळले होते की, हे ऐवढे काहीच नाही. आशीष शाह असे म्हटले होते की, त्यांच्याकडे गुंतवणूकीसाठी काही पैसेच नव्हते. मात्र त्याच दरम्यान दोघांनी मिळून असे काही केले ज्याबद्दल कधीच कोणी विचार ही केला नसेल. ते आपल्या संपूर्ण टीमसोबत सुट्टी घालवण्यासाठी गोव्याला गेले आणि तेथेच आपला प्लॅन एक्झिक्युट केला.
पहिल्याच दिवशी वेबसाइट क्रॅश
ऑगस्ट २०१२ मध्ये पेपरफ्रायला अखेर ग्राहकांसाठी लॉन्च केले गेले. जाहिरात-प्रचार केल्यानंतरच्या काही तासांमध्ये त्यांना १४०० रुपयांची ऑर्डर ही मिळाले. हे टीमला अपेक्षितच नव्हते. तर कंपनीच्या अध्यक्षांना अशी अपेक्षा होती की, सहा महिन्यात दररोज ४०-५० ऑर्डर येऊ शकतात. मात्र लॉन्चिंगच्या दिवशीच रात्री उशिरा अधिक ट्रॅफिकमुळे कंपनीची वेबसाइट क्रॅश झाली. त्यावेळी पेपरफ्रायच्या संपूर्ण टीमला ग्राहकांना फोन करावा लागला होता आणि त्यांना आश्वासन द्यावे लागले होते की, त्यांचे पेमेंट त्यांना मिळाले आहे आणि त्यांची ऑर्डर त्यांना पाठवली जाईल.

ग्राहकांना विश्वासात घेतले
पेपरफ्रायचे पहिलेच ऑफिस २५ व्यक्ती व्यवस्थितीत बसतील असे होते. मात्र पाच महिन्याच्या आतमध्येच त्यांच्या टीममध्ये वाढ झाली. २०१३ च्या सुरुवातीला आशीष आणि अंबरीश यांनी नव्या अपेक्षेसह फर्निचर आमि होम फर्निशिंगकडे आपला कल वळवला. जेव्हा ते ऑनलाईन फर्निचर व्यवसायाचे सुरुवातीचे दिवस होते. ग्राहकांना विश्वासात घेणे फार गरजेचे होते. त्यासाठी फाउंडर्सने आपल्या ग्राहकांना जागृक करण्याचा ही प्रयत्न केला. अशातच त्यांना हळूहळू यामध्ये यश मिळत गेले. एप्रिल २०१३ मध्ये फर्निचरच्या वितरणसाठी कंपनीकडे जेथे १० ट्रक होते तेथे आता ४०० ट्रकची संख्या झाली होती. (Pepperfry Success Story)
२०१३ रोजी फंडिंग संपली
कंपनीच्या फाउंडर्सचे असे म्हणणे होते की, आपल्या देशात व्यवसायाची संस्कृती आहे आणि त्याचा एक वेगळाच पाया आहे. आम्ही तो मिळवला असून तेथवर पोहचण्यासाठी काही राष्ट्रीय कंपन्यांकडून ही शिकलो. वर्ष २०१३ मध्ये अशी एक वेळ आली होती जेव्हा फंडिगच संपली. तेव्हा १५ लोकांच्या ५० टक्के वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाहोता. जेणेकरुन लोकांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार नाही. ते सर्व १५ जण आज ही पेपरफ्राय कंपनीसोबत आहेत.
हे देखील वाचा- ‘असा’ होता जगातील पहिला लॅपटॉप
२०० मिलियन डॉलर कमावले
पेपरफ्रायने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत २०० मिलियन डॉलर कमावले आहेत. पेपरफ्रायच्या व्यवस्थापकांचे असे मानणे आहे की, जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे योग्य प्लन आहे तर तु्म्हाला त्याच्या सोबतच चालायचे आहे. दहा वर्षानंतर पेपरफ्राय टीममध्ये ५०० लोकांचा समावेश झाला आहे. खास गोष्ट अशी की, आज ही कंपनी प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये गोव्याची ट्रिप करते.