वर्षभरात येणाऱ्या सर्व २४ एकादशी या भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीचे व्रत केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. प्रत्येक एकादशीचे फळ वेगवेगळे मिळत असले तरी सर्वच एकादशी या मोक्ष प्रदान करणाऱ्या आहेत. त्यामुळेच या एकादशी तिथीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. अश्विन महिन्यात पापांकुशा एकादशीचे व्रत पाळले जाते. पापांकुशा एकादशीचे व्रत शारदीय नवरात्र आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाळले जाते. त्यामुळे यंदा हे व्रत ३ ऑक्टोबर अर्थात शुक्रवारी पाळले जाणार आहे. पापांकुशा एकादशीबद्दल, या एकादशीच्या महत्त्वाबद्दल आणि लाभांबद्दल आपण या लेखातून माहिती जाणून घेऊया. (Ekadshi 2025)
पापांकुशा एकादशी तिथीची सुरुवात गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.१० वाजता सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३२ वाजता या तिथीची समाप्ती होईल. उद्यतिथीनुसार पापांकुशा एकादशी व्रत शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी पाळले जाईल. यावेळी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी ६.१५ ते १०.४१ राहील. (Marathi News)
पुराण ग्रंथांमध्ये पापांकुशा एकादशीबद्दल लिहिले आहे. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की, या एकादशी व्रतासारखे उत्तम फळ देणारे दुसरे कोणतेही व्रत नाही. पापांकुशा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्यास आणि गरजू लोकांना दान दिल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यासोबतच पापांकुशा एकादशी ही हजार अश्वमेध आणि शंभर सूर्ययज्ञचे फळ देणारी एकादशी आहे. आपल्या पुराणानुसार, जी व्यक्ती या एकादशीच्या दिवशी सोने, तीळ, जमीन, गाय, धान्य, पाणी, चप्पल आणि छत्रीचे दान करते, तिच्यावर कायम भगवान विष्णूची कृपा राहते. त्याला मृत्यूचे भय राहत नाही. (Top Marathi News)
पापांकुशा एकादशीची पूजा कशी करावी?
पापांकुशा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादिकर्म आटोपून घ्यावे. घरातील देव्हारा स्वच्छ करुन भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी. नंतर कलशाची स्थापना करुन त्यावर पाणी, आंब्याची पाने आणि नारळ ठेवावे. पूजा करताना विष्णु सहस्रनाम किंवा “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप, दिवे, फळे, पंचामृत आणि मिठाईचा भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवावा. नंतर भगवान विष्णूंची आरती करुन मंत्रांचा जप करावा. (Todays Marathi Headline)

पापांकुशा एकादशीला दानाचे महत्त्व
आपल्या परंपरेत दानाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. दानाला सर्व दुःख व व्याधींवर मात करण्याचा अचूक उपाय मानले गेले आहे. सनातन धर्मात शतकानुशतकांपासून दानाची परंपरा आहे. लोकांनी मन:शांती, मनोकामना पूर्ण होणे, पुण्यप्राप्ती, ग्रहदोषांपासून मुक्ती आणि देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी दान करायला हवे. दानाचा लाभ केवळ या जीवनातच नव्हे, तर मृत्यूनंतरही मिळतो. मृत्यूनंतर जेव्हा धर्मराजाच्या समोर आपल्या कर्मांचे मूल्यांकन केले जाते, तेव्हा हेच पुण्यकर्म कामी येते. दानाने मिळवलेले पुण्य पृथ्वीवर असताना आणि इथून जातानाही आपल्या सोबत असते. (Top Trending Headline)
पापांकुशा एकादशी कथा
युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना अश्विन शुक्ल एकादशीचे महत्त्व आणि व्रत पद्धतीबद्दल तपशीलवार सांगण्याची विनंती केली. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हणतात. ही एकादशी सर्व पापे दूर करणारी आणि यमलोकाच्या दुःखापासून मुक्ती देणारी आहे. (Top Marathi News)
भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेली पाशांकुशा एकादशीच्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक क्रूर शिकारी राहत होता. तो एक अतिशय हिंसक, निष्ठूर, अनीतिमान, पापी कृत्ये करणारा व्यक्ती होता. काळाच्या ओघात त्याच्या आयुष्यातील शेवटचा क्षण येणार होता. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी यमाच्या दूतांनी त्याला निरोप दिला की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, उद्या ते तुझा प्राण घ्यायला येतील. (Latest Marathi Headline)
हे जाणून क्रोधन खूप दुःखी झाला आणि घाबरला. यावर उपाय जाणून घेण्यासाठी तो अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला. त्यांनी अंगिरा ऋषींना नमस्कार केला आणि आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. तो म्हणाला की, त्याने आयुष्यभर पापकर्म केले आहे. यापासून मला मुक्त व्हायचे आहे, म्हणून आपणास विनंती आहे की असा काही उपाय सुचवावा, ज्याने मला मोक्ष मिळेल आणि मी पापांपासूनही मुक्त होईन. (Top Trending News)
=======
Dussehra 2025 : दसऱ्याच्या दिवशी निलकंठ पक्षी दिसणे शुभ की अशुभ?
=======
मग ऋषींनी पाशांकुशा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे पाळण्यास सांगितले. मग त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे पाशांकुशा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट झाली. जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांनाही श्रीहरींच्या कृपेने मोक्ष मिळाला. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की, जो पाशांकुशा एकादशीचे व्रत करतो, त्याला योग्य जीवनसाथी मिळतो. पैशाची आणि धान्याची कमतरता राहत नागी. व्रत करणरी व्यक्ती केवळ स्वत:लाच वाचवत नाही, तर त्याच्या अनेक पिढ्याही सुखावतात. या दिवशी सोने, तीळ, अन्न, पाणी, छत्र इत्यादी दान करणे उत्तम. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
