Home » पाणीपुरी ‘या’ नावांनी आहे सर्वत्र प्रसिद्ध

पाणीपुरी ‘या’ नावांनी आहे सर्वत्र प्रसिद्ध

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pani Puri Names
Share

पाणीपुरीचे कोणी नाव जरी काढले तरी सगळ्यांच्याच तोंडाला पाण्याच्या धारा लागतात. गोड, तिखट, चटपटीत पाणी खरपूस, टम्म फुगलेल्या कुरकुरीत पुरीमध्ये भरून संपूर्ण पुरी एकाच घासत तोंडात घालताना येणारी मजा आणि मग जिभेला चव लागल्यानंतर मिळणारे स्वर्गसुख. याचे वर्णन म्हणजे निव्वळ अहाहा……पाणीपुरी आवडत नाही अशी व्यक्ती या जगात शोधूनही सापडणार नाही.

कधी कधी आपल्या देशातील या पदार्थावर खूपच अभिमान जाणवतो. आपल्या शहरात, घराजवळ असे कोणतेतरी एक ठिकाण नक्कीच असते जिथली पाणीपुरी आपल्याला नेहमीच आवडते. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुमच्याकडे, तुमच्या शहरात जरी हा पदार्थ ‘पाणीपुरी’ या नावाने प्रसिद्ध असला तरी दुसऱ्या राज्यात अथवा शहरात त्याचे नाव वेगळे आहे. या पाणीपुरीला अनेक विविध नावांनी ओळखले जाते, या लेखातून हीच विविध नावं आपण जाणून घेऊया.

१) गोल गप्पे
गोल गप्पे नावाची, मसालेदार पाणीपुरी ही दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मिर, हरियाणा, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात खाल्ली जाते. या गोल गप्प्यांमधे बटाटा, छोटे, चटणी यांचं सारण भरतात. आणि तिखट पाण्यात बुडवून खायला दिले जातात.

२) फुचका
भारतातील पूर्वेकडील बिहार, झारखंड राज्यात आणि पश्चिमेकडे बंगालमधे फुचका नावाची पाणीपुरी खाल्ली जाते. फुचकाच्या सारणासाठी उकडलेले हरभरे, उकडलेला बटाटे कुस्करुन वापरले जातात. फुचकाची चटणी तिखट असते आणि पाणी मसालेदार असतं. फुचका इतर पाणीपुरींपेक्षा आकारानं मोठी असते. ही पुरी गव्हाच्या कणकेपासून तयार केली जाते.

Pani Puri Names

३) पाणीपुरी
ही पाणीपुरी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यात खाल्ली जाते. ही अशीच पाणीपुरी नेपाळ या देशातही मिळते. पण प्रांतानुसार या पाणीपुरीच्या चवीत मात्र फरक जाणवतो. गुजरातमधे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि गोड चटणी असं सारण पाणीपुरीत भरतात. तर महाराष्ट्रात चिंचेची गोड चटणी, पुदिन्याचं हिरवं तिखट पाणी हे पाणीपुरीचे वैशिष्ट्य आहे.

४) पकौडी
पाणीपुरीला कोणी पकौडी कसं म्हणेल बरं. पण गुजरात आणि मध्यप्रदेश मधील काही भागात पाणीपुरी पकौडी नावानं ओळखली जातात. ही पकौडी देताना हिरवी मिरची आणि पुदिन्याचं पाणी घातलं जातं. खायला देताना वरुन बारीक शेव टाकली जाते.

५) गुपचुप
पाणीपुरीचं हे एक मजेशीर नाव आहे. गुपचुप प्रकारची पाणीपुरी तोंडात टाकल्यावर काही वेळ बोलताच येत नाही, म्हणून ही पाणीपुरी गुपचुप नावानं ओळखली जाते. ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, हैद्राबाद आणि तेलंगणामधील काही भागात ही गुपचुप प्रकारची पाणीपुरी मिळते. यात पांढऱ्या वाटाण्याचं आणि उकडलेल्या बटाट्याचं सारण आणि तिखट मसालेदार पाणी हे या गुपचुपचं वैशिष्ट्य.

६) पानी के बताशे
उत्तर प्रदेशात पाणीपुरी ही पानी के बताशे नावानं ओळखली जाते. याची पुरी आपल्या नेहमीच्या पाणीपुरीसारखीच असते. सारण मात्र वेगळं असतं.

७) टिक्की
कबाबसारखं वाटणारं नाव. पण ही आहे पाणीपुरी. मध्यप्रदेशातील होशंगाबादमधे पाणीपुरीला टिक्की म्हणून ओळखलं जातं. ही टिक्की एरवीच्या पाणीपुरीपेक्षा छोट्या आकाराची असते.

८) फुलकी
उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये काही भागात पाणीपुरी ही फुलकी नावाने ओळखली जाते. ही पाणीपुरी महाराष्ट्रात मिळणाऱ्या पाणीपुरीसारखीच असते, फक्त नाव वेगळं आहे.

======

हे देखील वाचा : ‘आयुष्यमान भारत योजने’बद्दल जाणून घ्या सर्व माहिती

=======

९) पताशी
राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच लखनऊमधील अनेक भागांमध्ये पाणीपुरीला पताशी नावाने ओळखले जाते.

१०) पडका :
पाणीपुरी हे अलीगडमधील पडका, पाडैकुपी या दुसर्‍या नावाने देखील ओळखले जाते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.