Home » पांघरूण (Panghrun): एक विलक्षण प्रेमकहाणी

पांघरूण (Panghrun): एक विलक्षण प्रेमकहाणी

by Correspondent
0 comment
Panghrun: Love story of Widow Marathi info
Share

‘पांघरूण!’ पांघरूण (Panghrun) म्हणजे मायेचा उबदार स्पर्श! पांघरूण म्हणजे दैनंदिन आयुष्यामधली महत्वाची गोष्ट- हवीहवीशी वाटणारी! अगदी हव्याहव्याशा वाटणाऱ्या ‘पांघरूण’ या संकल्पनेवर आधारित एक कथानक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

काकस्पर्श आणि नटसम्राट यांसारख्या दर्जेदार कलाकृतींचे दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट ‘पांघरूण (Panghrun)’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला होता. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसंच, चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींनी विशेष कौतुक केले. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलर पाहून ‘पांघरूण’ चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. 

महेश मांजरेकर बस नाम ही काफी है! दरवेळी काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या दर्जेदार आणि वेगळ्या वळणावरचे असामान्य विषय लोकांसमोर मांडण्यात हातखंडा असणारे महेश मांजरेकर आता ‘पांघरूण’ चित्रपटातून कुठला वेगळा विषय लोकांसमोर आणणार याची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. पांघरूण हा एक चित्रपट नसून ही एक कलाकृती आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

 चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ट्रेलरमध्ये १९६०च्या आसपासचा काळ दिसत असून त्यावेळच्या निसर्गरम्य कोकणचे दर्शन घडत आहे. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी ‘एक विलक्षण प्रेम कहाणी’ आपल्याला ‘पांघरूण’ मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

महेश मांजरेकर व झी स्टुडिओज ‘पांघरूण’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे, तर वैभव जोशी यांनी यामधील गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेल, अविस्मरणीय संगीत व भावनिक दर्जेदार असे कथानक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

=====

हे देखील वाचा: संजय जाधव पहिल्यांदाच करणार ऐतिहासिक प्रेमकहाणीचे छायांकन!!

=====

‘पांघरूण’ चित्रपटाबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी सांगितलं, “या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांनी उत्तम कथानकासोबतच सांगीतिक खजिना प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. 

महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत, जे नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. उत्कृष्ट विषय हाताळण्यात महेश मांजरेकर अव्वल आहेत. याशिवाय सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. चित्रपटातील गाणीही  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे ‘पांघरूण’च्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांसोबत आम्हीही खूप उत्सुक आहोत.”  

दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘पांघरूण’बद्दल म्हणतात, “बराच काळ आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होतो. अखेर ४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना ‘पांघरूण’ पाहता येणार असल्याने मीसुद्धा खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून जे कौतुक होत आहे, याचा खूप आनंद आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

‘पांघरूण’चे संगीत सुद्धा उत्तम झाले आहे. आता हळूहळू अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होऊ लागले  आहेत आणि मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत, त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. प्रेक्षकांनी आजवर ज्याप्रमाणे माझ्या इतर चित्रपटांवर प्रेम केले तसेच प्रेम ‘पांघरूण’वरही करतील, याची  मला खात्री आहे.”

मराठीमध्ये अलीकडे नवनवीन विषयांवरचे उत्तमोत्तम चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे ‘पांघरूण’ मधील प्रेमकहाणी हा प्रेक्षकांसाठी एक चांगला अनुभव असणार आहे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.