कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड फार महत्वाचे कागदपत्र झाले आहे. आजच्या काळात पॅन कार्डचा वापर बँक खाते सुरु करण्यापासून ते कर्ज घेण्यासाठी उपयोगात येते. पॅन कार्ड हे अत्यंत खासगी कागदपत्रांपैकी एक आहे. याच कारणास्तव ते सांभाळून ठेवले जाते. पण काही वेळेस पॅन कार्डच्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे ही समोर येतात. अशातच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, तुमच्या पॅन कार्डचा दुरपयोग तर केला जात नाही ना? (PAN Card Misuse)
फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या पॅन कार्डचा वापर करुन कर्ज घेणे, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे, ज्वेलरी अथवा हॉटेल, गाडी भाड्याने घेण्यासाठी वापर करु शकतो. त्यामुळे जर तुमचे पॅन कार्डचा वापर एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी वापरले गेले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळेच आपल्या पॅन कार्ड बद्दल नेहमीच काळजी घेतली पाहिजे.
PAN Card च्या चुकीच्या वापराबद्दल कसे तपासाल
-सर्वात प्रथम आपला क्रेडिट स्कोर तपासून पहा
-क्रेडिट स्कोर तपासण्यासाठी TransUnion CIBIL, Equifax, Experian, Paytm, Bank Bazaar आणि CRIF High Mark सारख्या वेबसाइट्सचा वापर करा
-आता वेबसाइट सुरु करा
-येथे क्रेडिट स्कोर तपासून पहा. ही माहिती तुम्हाला फ्री मध्ये पाहता येते
-आता मागितलेली सर्व माहिती द्या
-तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी द्या
-तुमच्या स्क्रिनवर आता क्रेडिट कार्ड स्कोरची अधिक माहिती येईल. यावरुन तुम्हाला कळेल की, तुमच्या नावावर काय केले जात आहे
PAN Card च्या चुकीच्या वापराबद्दल रिपोर्ट
जर तुम्हाला कळले की तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर केला जात आहे तर तुम्ही आयकर संपर्क केंद्राच्या माध्यमातून तक्रार दाखल करु शकता.
-सर्वात प्रथम TIN NSDL च्या ऑप्शनवर जा
-आता कस्टमर केअर सेक्शनमध्ये जा
-आता ड्रॉप-डाउन मध्ये मेन्यूवर जात Complaints/Queries वर क्लिक करा
-आता तुमच्या समोर एक कंप्लेंट फॉर्म सुरु होईल
-या फॉर्म योग्य पद्धतीने भरा आणि कॅप्चा कोड टाकून तो सबमिट करा (PAN Card Misuse)
हे देखील वाचा- ५ हजार रुपयांत ५० लाखांचा बीमा, संपूर्ण परिवाराच्या सुरक्षिततेसाठी LIC चा खास प्लॅन
तर पॅनकार्ड जारी करण्यामागी मूळ उद्देश असा की, तुमच्या आर्थिक ट्रांजेक्शवर नजर ठेवली जाते. त्याचसोबत फसवणूकीचे प्रकारावर आळा घालणे. पॅन कार्ड सध्या सर्वांकडेच असते. परंतु त्याच्या वैधते बद्दल फार कमी लोकांना माहिती असते. खरंतर पॅन कार्डची वैधता आयुष्यभर असते. पण जेव्हा पॅन कार्ड धारकाचा मृत्यू होतो त्यानंतर ते वैध राहत नाही. तसेच पॅन कार्डवर असलेला १० अंकी क्रमांक हा तुमच्या आर्थिक स्थिती आणि व्यक्तीबद्दल अधिक माहिती देणारा असतो. एकापेक्षा अधिक पॅन कार्ड बाळगल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.