Home » मुलांसाठी पॅन कार्ड काढायचे असेल तर जाणून घ्या प्रक्रिया

मुलांसाठी पॅन कार्ड काढायचे असेल तर जाणून घ्या प्रक्रिया

by Team Gajawaja
0 comment
PAN Card
Share

पॅन कार्ड देशाच्या प्रत्येक कर पेमेंट करणाऱ्या नागरिकाला जारी केले जाते. हे १० अंकीय विशिष्ट ओळखपत्र असते. सर्व कर-पेमेंट करणारे व्यक्ती, व्यावसायिक, संघटना आणि स्थानिक सरकारकडे पॅन कार्ड असणे गरजेचे असते. आपल्याला तर हे माहिती आहे की, पॅन कार्ड हे १८ वर्षावरील लोकांना दिले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, अल्पवयीन मुलांचे सुद्धा पॅन कार्ड असते.नियमांनुसार भारतात आयटीआर फाइल करण्याची कोणतीही सीमा नाही. जर एखादा अल्पवयीन १५ हजारांहून अधिक पैसे कमवत असेल तर तो आयटीआर फाइल करु शकतो. अशातच आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पॅन कार्ड मिळवण्यासाठी आयकर विभागाद्वारे कोणतीही विशिष्ट निर्धारित करण्यात आलेली नाही. (PAN Card for Minor)

अल्पवयीनला पॅन कार्डची आवश्यकता कधी भासते?
-जेव्हा तुम्ही मुलाच्या नावावर गुंतवणूक करतात
-जेव्हा तुम्ही मुलाला आपल्या गुंतवणूकीत नॉमिनी बनवता
-जेव्हा तुम्ही मुलाच्या नावावर एक बँक खाते सुरु करु इच्छिता
-जेव्हा अल्पवीयन कमवत असेल

कोण अर्ज करु शकतो?
अल्पवयीनसाठी पॅन कार्ड बनवायचे असेल तर त्याचा अर्ज पालक किंवा जो कोणीही कायदेशीर नातेवाईक आहे त्याच्याकडून केले जाऊ शकते. मुलाच्या वतीने आयटीआर दाखल करण्याची जबाबदारी ही पालकाची असते. फक्त अल्पवयीन मुलाच्या नावावर जारी करण्यात आलेल्या कार्डवर त्याचा फोटो किंवा स्वाक्षरी नसते. त्यामुळे त्याला ओळखपत्र म्हणून वापर केला जाऊ शकत नाही. जेव्हा अल्पवयीन १८ वर्षाचा होतोत तेव्हा त्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी अर्ज करावा लागतो.(PAN Card for Minor)

हे देखील वाचा- नोकरी सोडल्यानंतर कधी पर्यंत काढू शकतो ग्रॅच्युटीमधील पैसे? जाणून घ्या अधिक

PAN कार्डसाठी कसा कराल अर्ज?
-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जा
-फॉर्म 49A भरण्यासाठी नियम व्यवस्थित वाचा
-अल्पवयीन मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र आणि आई-वडिलांच्या फोटोसह अन्य कागदपत्र सुद्धा अपलोड करा. आता फक्त आई-वडिलांची स्वाक्षरी अपलोड करावी
-१०७ रुपये देऊन पेमेंट प्रोसीड करा. आता सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला एक पावती मिळेल. ज्याचा उपयोग तुम्हाला कोणत्याही अर्जाची स्थिती ट्रॅक करण्यासाठी केली जाऊ शकते
-वेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये तुमच्याकडे पॅन कार्ड येईल

दरम्यान, १ एप्रिल, २०२३ पासून आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आधार कार्डला लिंक करण्याची अखेरची तारीख २०२३ आहे. अशातच तुम्ही आता पर्यंत दोन्ही कागदपत्र लिंक केले नसेल तर त्या व्यक्तीचे पॅन कार्ड इनवॅलिड घोषित केले जाणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.